प्रतिनिधी / बेळगाव : एका ५८ वर्षाच्या वृद्धाने चक्क १८७ नाणी गिळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे .
या वृद्धाला पोटात दुखू लागल्याने बागलकोट कुमारेश्वर रुग्णालयात दाखल करण्यात आले. एक्स-रे काढणाऱ्या डॉक्टरला हे पाहून धक्काच बसला. पोटात १ किंवा २ नाही तर तब्बल १८७ नाणी सापडली. द्यामाप्पा हरिजन ( ५८ ) असे या वृद्धाचे नाव आहे . ५ रुपयांची ५० नाणी, २ रुपयाची ५१ नाणी, १ रुपयाची ८० असे एकूण १८७ नाणी त्यांच्या पोटात सापडली. बागलकोट कुमारेश्वर हॉस्पिटलचे डॉक्टर ईश्वर कलबुर्गी यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे .









