911 वर केला कॉल, म्हटला इमर्जन्सी
जगभरात पोलिसांशी संपर्क साधणे सर्रासपणे टाळले जाते. परंतु पोलीस वारंवार आम्ही लोकांच्या मदतीसाठी आहोत असे समजावत असतात. अशा स्थितीत एखाद्या मुलाने जेवणाची ऑर्डर देण्यासाठी इमर्जन्सी नंबरवर कॉल केल्यास. अमेरिकेत मुलांनी 911 वर कॉल केला तर पोलीस त्यांच्या तक्रारीवर आईवडिलांना अटक करू शकतात. परंतु एका अनोख्या घटनेत एका चिमुरड्याने 911 वर कॉल केला आणि खाद्यपदार्थाची ऑर्डर दिला. आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांनी मुलाची ऑर्डर पूर्णही केली.
अमेरिकेच्या ओक्लाहोमामध्ये एका चिमुरड्याने केलेल्या कॉलचा ऑडिओ मूर पोलिसांनी शेअर केला आहे. बेनेट नावाच्या मुलाने इमर्जन्सी नंबर 911 वर कॉल करत डोनेट्सची मागणी केली होती. हा कॉल पोलिसांसाठी देखील चकित करणारा होता. .911, ही इमर्जन्सी आहे, डोनेट्स हवे आहेत, असे मुलाने म्हटले होते. तर संबंधित कर्मचाऱ्याने बेनेटला तुम्ही डोनेट्स अन्य कुणाला द्याल का असे विचारल्यावर बेनेटने नाही असे उत्तर देत फोन ठेवून दिला होता.
याच्या दुसऱ्या दिवशी पोलीस विभागाने बेनेटची इच्छा पूर्ण केली आणि अधिकाऱ्यांनी त्याच्या घरी एक डंगिनच्या डोनेट्सचा बॉक्स पाठविला. अधिकाऱ्यांनी बेनेटच्या घरी जात तू डोनेट्ससाठी कॉल केला होतास का असे विचारले. मग आम्ही तुला काही डोनेट्स द्यायला आलो आहोत असे सांगितले. हे ऐकल्यावर बेनेटला आनंद झाला. अधिकाऱ्यांनी बेनेटसोबत त्याच्या भावालाही डोनट दिला होता.
बेनेटने एका जुन्या सेलफोनने संपर्क केला होता, ज्याचा आता कुठलाही वापर केला जात नव्हता. परंतु अद्याप त्याद्वारे 911 नंबरवर कॉल केला जाऊ शकतो. जुने फोन सध्याच्या हायस्पीड नेटवर्कचा वापर करू शकत नसले तरीही त्याद्वारे 911 इमर्जन्सीचा वापर केला जाऊ शकतो असे पोलिसांनी सांगितले.









