वृत्तसंस्था/ पाँडिचेरी
2023 च्या क्रिकेट हंगामातील येथे सुरु असलेल्या देवधर करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेतील झालेल्या चुरशीच्या सामन्यात हार्विक देसाई आणि अतित सेट यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर पश्चिम विभागाने मध्य विभागावर केवळ एक गड्याने थरारक विजय मिळविला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मध्य विभागाने 50 षटकात 7 बाद 243 धावा जमवल्या. त्यानंतर पश्चिम विभागाने 49.4 षटकात 9 बाद 244 धावा जमवित निसटता विजय नोंदवला. या सामन्यात पश्चिम विभागाला चार गुण मिळाले.
मध्य विभागाच्या डावात यश दुबेने 4 चौकारासह 49, कर्णधार वेंकटेश अय्यरने 1 षटकार आणि 4 चौकारासह 43, कर्ण शर्माने 1 षटकार आणि 5 चौकारासह 44, शिवम मावीने 3 षटकार आणि 3 चौकारासह 47, उपेंद्र यादवने 1 षटकारासह 26 धावा जमवल्या. पश्चिम विभागातर्फे मुलानीने 2 तर अतित सेट, राजवर्धन हंगरगेकर, चिंतन गजा आणि पार्थ भूत यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना पश्चिम विभागाच्या डावात सलामीच्या हार्विक देसाईने86 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकारासह 57, कर्णधार पांचाळने 1 षटकार आणि 4 चौकारासह 36, सरफराज खानने 3 चौकारासह 24, अतित सेटने 53 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारासह नाबाद 53, राजवर्धन हंगरगेकरने 12 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 24, चिंतन गजाने 1 चौकारासह नाबाद 11 धावा जमवल्या. मध्dया विभागातर्फे शिवम चौधरीने 18 धावात 4 तर शिवम मावी, सरवटे व कोठारी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. तसेच कर्ण शर्माने 66 धावात दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : मध्य विभाग 50 षटकात 7 बाद 243 (दुबे 49, अय्यर 43, मावी नाबाद 47, कर्ण शर्मा 44, मुलानी 2-42, सेट, हंगरगेकर, चिंतन गजा, भूत प्रत्येकी एक बळी), पश्चिम विभाग 49.4 षटकात 9 बाद 244 (अतित सेट नाबाद 53, हार्विक देसाई 57, पांचाळ 36, सरफराज खान 24, हंगरगेकर 24, चिंतन गजा नाबाद 11, शिवम चौधरी 4-18, कर्ण शर्मा 2-66).









