वृत्तसंस्था/ पुणे
2023 च्या प्रो-कबड्डी लिग हंगामातील रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या. चुरशीच्या सामन्यात अजितकुमारच्या दर्जेदार खेळाच्या जोरावर जयपूर पिंक पँथर्सने पाटणा पायरेट्सचा 29-28 अशा केवळ एका गुणाच्या फरकाने पराभव केला. या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सच्या व्ही. अजितकुमारने दर्जेदार खेळ करत 14 गुण नोंदविले.
या सामन्यात सुरूवातीपासूनच दोन्ही संघातील कब•ाrपटूंनी आपल्या आक्रमक चढायावर गुण वसूल करण्यास प्रारंभ केला. 5 व्या मिनिटाअखेर जयपूर पिंक पँथर्सने 2-0 अशी आघाडी मिळविली होती. त्यानंतर 6 व्या मिनिटाअखेर पाटणा पायरट्सने 6-1 अशी आघाडी जयपूरवर मिळविली होती. 13 व्या मिनिटाला पाटणा पायरेट्सने जयपूर संघावर 13-3 अशी भक्कम आघाडी घेतली होती. सामन्याच्या मध्यांतरापर्यंत पाटणा पायरेट्सने पँथर्सवर 16-8 अशा 8 गुणांच्या फरकाने बढत मिळविली होती. 24 व्या मिनिटापर्यंत जयपूर पिंक पँथर्सने पाटणा पायरेट्सवर आघाडी मिळवत आपली स्थिती अधिक मजबूत केली होती. 24 व्या मिनिटाला जयपूर पिंक पँथर्स 18-10 अशा 8 गुणांच्या फरकाने आघाडीवर होते. सामन्याच्या शेवटच्या 10 मिनिटांच्या कालावधीत जयपूर पिंक पँथर्सच्या अजितकुमारने आपल्या शेवटच्या चढाईवर निरजकुमार व साजिन चंद्रशेखर यांना बाद करत आपल्या संघाला 29-26 असे आघाडीवर नेले. शेवटच्या चढाईवर भवानी रजपूतने पँथर्सला 29-28 असा एका गुणाने रोमांचक विजय मिळवून दिला.









