प्रतिनिधी /म्हापसा
डांगी कॉलनी म्हापसा येथील उदय दत्ताराम सावंत यांच्या कुंपणमध्ये घुसून पार्क करून ठेवलेल्या गाडी चोरण्याच्या प्रयत्नात असताना संशयित चोरटा ओंकार दिपक च्यारी रा. वेळूस वाळपई सत्तरी यास अटक केली नंतर येथेच्छ चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
त्याच्याबरोबर असलेले योगेश सावंत मोलेकर रा. नानूस वाळपई व क्रिष्णाजीत नाईक माशेल-फोंडा या अन्य दोघां साथीदारास उशीरा ताब्यात घेण्यात आले. या दोघांनी पळ काढला होता मात्र त्या दोघांना पडकण्यास पोलिसांना यश आले. मिळालेल्या माहितीनुसार ओंकार च्यारी दुचाकी व कारच्या टाक्या उघडून पेट्रोल चोरत असताना त्याला सावंत कुटुंबियांनी ताब्यात घेऊन विचारणार केली असता आपण पेट्रोल काढण्यासाठी तेथे आल्याची जबानी त्याने दिली. सोबत विविध प्रकारचे पानेही आणण्यात आले होते. ग्रामस्थांनी त्याला चोप देऊन नंतर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. याबाबत म्हापसा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. या भागात अनेक गाडय़ा चोरीस गेल्या असून यात त्याचा हात आहे काय याबाबत पोलीस तपास करीत आहे.









