बेंगळूर : बेंगळूर न्यायालयाने ट्विटरला काँग्रेसचे हँडल तात्पुरते ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. एमआरटी म्युझिक कंपनीने काँग्रेसच्या ३ नेत्यांविरुद्ध कॉपीराइट उल्लंघनाचा गुन्हा दाखल केला. यावर काँग्रेसने या कंपनीच्या गाण्यांचा वापर करून कॉपीराईट नियमाचे उल्लंघन केले असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. तसेच मायक्रोब्लॉगिंग साइट असलेल्या ट्विटरला काँग्रेस आणि तिच्या भारत जोडो यात्रा मोहिमेचे हँडल तात्पुरते ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत.
बेंगळूर स्थित म्युझिक कंपनी एमआरटी म्युझिक यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर ही सुनावणी करण्यात आली. राहुल गांधींचा समावेश असलेल्या भारत जोडो यात्रेच्या एका व्हिडिओमध्ये साउथचा सुपरहिट चित्रपट KGF- 2 मधील गाणी वापरल्याचा आरोप काँग्रेसवर केला होता. आपल्या तक्रारीत, या म्युजिक कंपनीने KGF- 2 मधील गाण्यांचे हिंदीत हक्क मिळवण्यासाठी मोठी रक्कम गुंतवल्याचे सांगितले. या आदेशात न्यायालयाने ट्विटरला कॉंग्रेसला दोन्ही हँडलवरून एकूण 3 लिंक काढून टाकण्याचे निर्देश देऊन काँग्रेस आणि भारत जोडो यात्रेचे ट्विटर हँडल ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








