टाटाच्या हॉस्पिटॅलिटी कंपनीचा समावेश
नवी दिल्ली
टाटा समूहाची हॉस्पिटॅलिटी कंपनी इंडियन हॉटेल्स कंपनीसाठी 2023 हे आर्थिक वर्ष उत्तम ठरले आहे. या कालावधीत कंपनीने 1,053 कोटी रुपयांचा विक्रमी नफा कमावला. हा कंपनीच्या तीन सर्वोत्तम आर्थिक वर्षांतील संयुक्त नफ्यापेक्षा जास्त आहे.
या अगोदर कंपनीला 2022 च्या आर्थिक वर्षात 265 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीच्या कामकाजातील महसूल 90 टक्क्यांनी वाढून 5,810 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. चौथ्या तिमाहीत कंपनीचा महसूल 86 टक्क्यांनी वाढून 1,625.4 कोटी रुपयांवर पोहोचला आणि नफा 339 कोटी रुपये झाला. 2022 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीला 72 कोटी रुपयांचा नफा झाला होता. या कंपनीची मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेलसह देशभरात अनेक हॉटेल्स आहेत. वर्ष 2006, 2007 आणि 2008 या आर्थिक वर्षांमध्ये संयुक्त नफा 974 कोटी रुपये होता.









