हर्णे/वार्ताहर
मागील 3 वर्षापासून बेवारस स्वरूपात हर्णे बंदर मार्गावर व सध्या हर्णे वडाजवळ हर्णे पाज रस्त्यावर उभी करून ठेवण्यात आलेल्या टाटा 709 या मच्छी वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या गाडीला दुपारी दोन चे सुमारास आग लागली. या आगीत पूर्ण गाडी जळून खाक झाली आहे. सदर गाडी मुरुड जंजिरा येथील एका मच्छी व्यापाऱ्यांची असल्याची चर्चा हर्णेत सुरू आहे.
रविवारी दुपारी या गाडीला आग लागल्यानंतर दापोली नगर पंचायतीच्या अग्निशमन दलाला बोलवण्यात आले. त्यानंतर आग पूर्ण विझविण्यात यश आले असले तरी गाडीचे पूर्ण नुकसान झाल्याचे दिसत आहे. प्राथमिक अंदाजानुसार गाडीचे 5 लाखाचे नुकसान झाले असल्याचे बोलले जात आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.