पाच पक्वान्नाचं जेवण असलं तरी कांदा आणि भाकरीची चव कशालाच येत नाही. पण भाकरीसोबत जर कांद्याची झणझणीत आणि चविष्ट चटणी असेल तर आणखीनच मजा.जर तुम्हाला भाजीचा कंटाळा आला असेल तर तुम्ही भाकरीसोबत ही चटणी नक्की ट्राय करू शकता. शिवाय ही झटपट देखील बनते. चला तर मग जाणून घेऊयात ही चटणी कशी बनवायची ते.
चटणीसाठी लागणारे साहित्य
२ कांदे
चिमूटभर हिंग
मीठ
३ चमचे तेल
१ चमचा लाल तिखट
कृती
सर्वप्रथम २ कांदे बारीक चिरून एका बाउल मध्ये घ्या. यानंतर त्यामध्ये एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घाला.आता यामध्ये चिमूटभर हिंग घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्या. आता गॅसवर तेल गरम करत ठेवा. आणि नंतर कांद्याच्या मिश्रणावर याची फोडणी ओता. सर्व मिश्रण पुन्हा एकदा हलवून घ्या. आणि गरमागरम भाकरीबरोबर ही स्वादिष्ट चटणी सर्व्ह करा.
Previous Articleपुण्यात सराईताचा धारदार शस्त्राने वार करून खून
Next Article मेकअप रिमूव्ह करण्यासाठी फॉलो करा या टिप्स









