उदगाव प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे,जालना येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून उदगांव (ता.शिरोळ) येथील छ.शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाज च्यावतीने सोमवारी लाक्षणिक उपोषण केले. यावेळी कोल्हापूर सांगली मार्गावर जाणार्या महाराष्ट्र शासनाच्या एसटी बसेसवर असलेल्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या पोस्टरला काळे फासून सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच तलाठी कार्यालय व ग्रामपंचायत आपल्या भावना शासन दरबारी कळवण्यासाठी निवेदन दिले.
मराठा आरक्षणा संदर्भात शासनाने त्वरित ठोस निर्णय घ्यावा यासाठी यावेळी लोकप्रतिनिधींना गावात प्रवेशबंदी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या उपोषणाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. त्यानंतर गावातून सकल मराठा समाजाच्या वतीने रॅली काढून तलाठी व ग्रामविकास अधिकारी यांना आरक्षण संदर्भात शासकीय दर्जा दरबारी मागणीचे पत्र देण्यात आले. तर उदगांव हे चळवळीचे गाव आहे. यामध्ये मराठा आरक्षणासाठी विशेष गाव सभा ग्रामपंचायतने घेऊन ठराव पास करून शासन दरबारी पाठवावा,सरकारने मराठा समाज्याच्या मागणी तात्काळ पुर्ण करावी अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांना पाठबळ देण्यासाठी राज्यातील मराठा समाज पेटून उठेल अशा इशारा सरकारला देण्यात आला.आंदोलन पूर्णत्वाकडे नेल्याशिवाय शांत बसणार नाही. अशी भीष्मप्रतिज्ञा यावेळी करण्यात आली.
यावेळी माधुरी शेलार, प्रतिभा कदम,मधुकर निकम, लाडू वरेकर, प्रकाश गडकरी, बंटी जाधव, पप्पू कंदले,अशोक वरेकर, शिवाजी गायकवाड,शरद लुगडे, राजू घाटगे, अनिल वरेकर, मंगेश घाटगे, शिवतेज निकम, अनिल जाधव, राहुल कदम, विनायक कदम, विजय कदम, विशाल जाधव यांच्यासह गावातील आणि परिसरातील सकल मराठा समाज बांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.









