सेंसर सांगणार उष्णतेच्या लाटेपासून वाचण्याचे मार्ग
60 अंश तापमानात झाले परीक्षण
वैज्ञानिकांनी घाम येणारा रोबोट तयार केला आहे. तसेच हा रोबोट थंडीत माणसांप्रमाणे कापू लागतो आणि श्वासही घेतो. वैज्ञानिकांनुसार मानवी शरीर उष्ण हवामानाशी कशाप्रकारे सामोरे जाते याचे अध्ययन करण्यासाठी हा रोबोट तयार करण्यात आला आहे. एरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी मानवी शरीराच्या थर्मल फंक्शनला समजून घेण्यासाठी एका मेनिविक्नला रीडिझाइन केले असून ज्याचा स्पोर्ट्स क्लोदिंग कंपनी वापर करते. याचे नाव ‘एएनडीआय’ ठेवण्यात आले आहे.
रोबोट ‘एएनडीआय’ला घाम फुटतो, याचे तापमान कळावे म्हणून यात 35 ठिकाणी सिंथेटिक पोर्स आणि हीट फ्लक्स सेंसर बसविण्यात आले आहेत. या रोबोटद्वारे माणसांवरील हवामान बदलाच्या प्रभावाचे अध्ययन केले जाणार आहे. अमेरिका, युरोपमध्ये सध्या लोक उष्णतेच्या लाटेमुळे त्रस्त आहेत. उष्णतेला लाटेपासून बचावासाठी आम्ही माणसांवर प्रयोग करू शकत नाही. माणूस कितीप्रमाणात उष्णता सहन करू शकतो हे जाणून घेण्यासाठी आम्ही त्याला उन्हात किंवा तप्त खोलीत ठेवू शकत नाही. याचमुळे आम्ही ‘एएनडीआय’ची निर्मिती केल्याचे वैज्ञानिक जेनी वॅनोस यांनी सांगितले.

‘एएनडीआय’चे परीक्षण आणि यावर अध्ययन करण्यासाठी त्याला हीट चेंबरमध्ये ठेवण्यात आले. हीट चेंबरला आम्ही ‘वॉर्म रुम’ म्हणत आहोत. येथील तापमान 60 अंश सेल्सिअस ठेवण्यात आले आहे. या रुममध्ये एएनडीआयला उष्ण हवा आणि सोलर रेडिएशनला सामोरे जावे लागत असल्याचे वॅनोस यांनी सांगितले.
एएनडीआयचे कार्यस्वरुप
एएनडीआयला उष्ण तापमानात ठेवण्यात आल्यावर यात होणाऱ्या बदलांशी निगडित डाटा जमविला जातो. यात लागलेले सेंसर्स हीट, सोलर रेडिएशनच्या संपर्कात येताच बॉडीमध्ये होणऱ्या प्रतिक्रिया नोंदवून घेतात. रोबोटच्या प्रत्येक हिस्स्यात चॅनेल लावलेले असून ते या रोबोटच्या विविध हिस्स्यांना काम करण्यासाठी कनेक्ट करतात. याच चॅनेल्सद्वारे रोबोटला घाम येत आहे.प्रत्यक्षात हा रोबोटचा एक अंतर्गत हिस्सा असून तेथे पाणी आहे. चॅनेल्स हीटअप म्हणजेच तप्त होताच येथील पाणी घामात रुपांतरित होते.
मॉडिफिकेशन शक्य
लोकांमध्ये उष्णता सहन करण्याची क्षमता वेगवेगळी असते. वजन, वयाच्या आधारावर वेगवेगळ्या लोकांनुसार उष्णतेच्या प्रभावावर रिअॅक्ट करता येईल अशाप्रकारे एएनडीआयला तयार करण्यात आले आहे. म्हणजेच रोबोट एक डायबेटिक आणि सामान्य व्यक्तीच्या थर्मल फंक्शनमधील फरक ओळखू शकतो. एएनडीआयमध्ये मॉडिफिकेशन केले जाऊ शकते. याचे सेंटिंग्स वेगवेगळ्या लोकांचे वजन-वयानुसार बदलले जाऊ शकते. अशाचप्रकारे वॉर्म रुमचे तापमान देखील बदलले जाऊ शकते असे वैज्ञानिक अंकित जोशी यांनी सांगितले आहे.









