पलूस येथील शिवाजीनगर ते बांबवडे मार्गावर शेतात रविवारी सायंकाळी ऊसतोडणी यंत्राणे अचानकपणे पेट घेतला. या आगीत यंत्राच्या टायर्स व अन्य साहित्य जळून खाक झाले असून 30 ते 35 लाखाचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही निवीत हानी झाली नाही. आग आटोक्यात आण्यासाठी तासगाव नगरपरिषद व क्रांती कारखान्याच्या अग्निबंबांना पाचारण करण्यात आले होते.
रविवारी दुपार पासून शिवाजीनगर येथील अशोक सारंग पवार यांच्या शेतात यंत्राच्या सहाय्याने ऊस तोडणीचे काम सुरू होते. दरम्यान यंत्रचालकाने काही वेळ काम थांबवून वाहनाची ऑईल बदली केली. त्यानंतर पुन्हा यंत्र चालूकरून कामास सुरुवात केली असता यंत्राच्या खाली अचानकपणे दिसली किरकोळ आग असल्याने त्याने खाली उतरून यंत्रात असणाऱ्या फायरबॉक्सने ही आग अटोक्यात आण्याचा प्रयत्न केला मात्र तो अपयशी ठरला. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही.
दरम्यान, जासूराचे लोट दिसताच आजू बाजूस असणाऱ्या शेतकयांनी पटनास्थळी धाव घेतली व अग्निबंधांना पाचारण केले परंतु तो पर्यंत मशीन जळून खाक झाले होते. एक एक करीत टायर्स पेट घेत असल्याने टायर फुटलेल आवाज येत असल्याने पाहण्यासाठी आलेल्या शेतकन्यांन आलेल्यांनी दूर राहणे पसंत केले सुमारे तासभरच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








