सातारा प्रतिनिधी
साताऱ्यात आनेवाडी टोलनाक्यानजीक रायगाव गावच्या हद्दीत एसटी महामंडळाच्या ‘विठाई’ बसला अचानक आग लागली.. या आगीत बस संपूर्ण जळून खाक झालीये.. राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जात असताना शॉर्टसर्किटमुळे बसला आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समजत आहे..इंजिन ला आग लागल्याचे समजतात चालकाने प्रसंगावधान राखत बस तात्काळ महामार्गावर थांबवत बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवले.. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.. घटनेची माहिती समजताच एसटी चे कर्मचारी आणि अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी रवाना झालीये.. आगीचे आणि धुराचे लोळ महामार्गावर पसरल्याने पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक सर्व्हिस रोड वरून वळवण्यात आलीये..घटनास्थळी तालुका आणि महामार्ग पोलीस दाखल झाले आहेत..
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









