आत्मपरीक्षण करुन यश प्राप्तीसाठी परीश्रम करावे : तुळशीदास गावस कासरवर्णे येथे विद्यार्थी गौरव कार्यक्रम
प्रतिनिधी /पेडणे
विद्यार्थ्याने स्वतःशी स्पर्धा करणे गरजेचे असून आज आपण विविध क्षेत्रात शिक्षण घेत असताना दुसऱयाकडे स्पर्धेच्या रूपाने न पाहता आपणामध्ये आत्मपरीक्षण करून आपल्यामध्ये स्पर्धा करण्याची गरज असून आपल्यात ज्या काही उणीवा, त्रुटी आहेत त्या दूर करून ध्येयाचा पाठलाग करून यशाकडे जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ध्येय आणि चिकाटी यांच्या बळावरच यश प्राप्त करता येते, असे प्रतिपादन चांदेल हसापूर ग्रामपंचायतीचे सरपंच तुळशीदास गवस यांनी केले.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कासारवर्णे पेडणे यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ तसेच ज्ये÷ नागरिकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे या नात्याने तुळशीदास गवस बोलत होते.यावेळी व्यासपीठावर खास निमंत्रित धारगळ ग्रामपंचायतचे माजी सरपंच व पंच सदस्य भूषण नाईक, पेडणे नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेविका उषा नागवेकर, प्रमुख वक्ते नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर, फुले शाहू आंबेडकर प्रति÷ानचे अध्यक्ष महादेव गवंडी, मंडळ अध्यक्ष बाबुराव गाड, सचिव समीर धुरी आदी उपस्थित होते.
यापुढे बोलताना तुळशीदास गवस म्हणाले की, संस्कृती जपण्याचं काम आणि तिचं संवर्धन करण्याचं काम भारत देशात विविध स्तरावर होत असताना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनेही दरवषी विविध उपक्रम देशभर आणि राज्यभर राबवले जातात. या उपक्रमाच्या माध्यमातून पेडणे तालुक्मयातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मार्फत विविध समाजप्रयोगी उपयोगी असे कार्यक्रम आयोजित करून एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला जातो. उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन या मंडळातर्फे राबवले जातात यासाठी हे मंडळ निश्चितच कौतुकास्पद पात्र असून भविष्यासाठी असेच कार्यक्रम त्यांनी आयोजन करून या भागातील युवकांना खास करून कासारवडणे गावातील युवकांना तसेच विद्यार्थी कलाकार यांना एक व्यासपीठ निर्माण करून द्यावे, असे उद्गार यावेळी तुळशीदास गवस यांनी काढले.
प्रमुख वक्ते कृष्णा पालयेकर बोलताना म्हणाले की, एखाद्या स्पर्धेत विद्यार्थ्याने शिक्षण घेताना आपण आपली कमजोरी असेल तर त्यामुळे खचून न जाता तीच आपली भक्कम बाजू आहे त्यासाठी खंबीरपणे उभे राहून पुढे जाण्याची गरज आहे. कुठल्याही परिस्थितीत आपण न डगमगता येणाऱया संकटाला सामोरे जाण्याचे धाडस आपल्याकडे असायला पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना विविध क्षेत्रातील ज्ञान संपादन करण्याची गरज असून त्यासाठी अवांतर वाचन तसेच इतर गोष्टीची ज्ञान आणि माहिती जाणून घेण्याची आवश्यकता आहे. यशाचा पाठलाग करताना एक दरवाजा बंद झाला तरी हजारो दरवाजे उघडतात हे लक्षात ठेवून प्रत्येकाने आपल्या ध्येयाचा पाठलाग करून यशापर्यंत पोहोचल पाहिजे.
यावेळी महादेव गवंडी म्हणाले की, पेंढणे तालुका आणि गोव्या राज्यात अनेक सांस्कृतिक गणेशोमंडळ आहे मात्र कासारवर्णे येथील गणेशोत्सव मंडळातर्फे विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून त्या ठिकाणी उत्सव साजरा केला जातो या भागातील मराठी प्राथमिक शाळा बंद असलेली शाळा परत या मंडळांनी सुरू करून एक नवा आदर्श जनतेसमोर ठेवला आहे तसेच रक्तदानासारखे तसेच गौरव सोहळा हरके विविध कार्यक्रम द्वारे आपला ठसा पेडणे तालुक्मयाचा नव्हे तर संपूर्ण गोव्या राज्यात उमटवला आहे त्यांच्या कार्याला दखल इतरही सार्वजनिक गणेश मंडळाने घेऊन समाजाप्रती आपलं कर्तव्य निवावे असे उद्गार यावेळी शाहू फुले आंबेडकर प्रति÷ानचे अध्यक्ष महादेव गवंडी यांनी काढले.
यावेळी धारगाळचे माजी सरपंच भूषण नाईक यांनी कासरवर्णे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित करत असलेल्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी वासुदेव परब, चंद्रकांत नाईक, रामा बोरडेकर, चंद्रकांत मावलिंगकर, कृष्णा वेर्णेकर, योगेश केणी व उत्कर्ष पालेकर यांचे विविध क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन त्यांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
स्वागत व प्रास्ताविक बाबुराव गाड यांनी केले. संतोष पालयेकर यांनी सूत्रसंचालन केले तर विनय नाईक यांनी आभार मानले.









