मुंबई :
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा समभाग शेअरबाजारात शुक्रवारी दमदारपणे सामील झालेला पाहायला मिळाला. सदरचा बँकेचा समभाग 60 टक्के प्रिमीयमसह 40 रुपये भावावर बाजारात लिस्ट झाला असून याची इशु किंमत 25 रुपये इतकी होती. बीएसईवर हा समभाग शुक्रवारी सकाळी 39.95 रुपयांवर खुला झाला. 500 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आयोजीत उत्कर्षच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी दमदार प्रतिसाद नोंदवला.









