एप्रिल 2023 ची आकडेवारी सादर : हिरो मोटोकॉर्प आघाडीवर
मुंबई:
2024 च्या आर्थिक वर्षातील पहिल्या महिन्यात दुचाकी विक्रीत हिरोव्यतिरीक्त बजाज, रॉयल एनफिल्डने चांगली कामगिरी केली आहे. पॅसेंजर विक्रीतही मागच्या महिन्यात चांगली वाढ झाली असून, दुचाकी विक्री पाहता हिरो मोटोकॉर्प आघाडीवर आहे. यासोबत स्पर्धेत बजाज, टीव्हीएस व रॉयल एनफिल्ड यांनीही देशांतर्गत बाजारात विक्रीत समाधानकारक कामगिरी प्राप्त केली आहे.

हिरो मोटोकॉर्पने एप्रिल 2023 मध्ये 3 लाख 86 हजार 184 दुचाकींची एकंदर विक्री केली आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत विक्रीत 3 टक्के घट नेंदली आहे. होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया यांनी मागच्या महिन्यात 3 लाख 38 हजार 289 दुचाकींची विक्री केली आहे. वर्षाच्या आधीच्या तुलनेत या खेपेला विक्रीत 6 टक्के वाढ दिसली आहे. टीव्हीएसने 2 लाख 32 हजार दुचाकींची विक्री केली असून विक्रीत मागच्या वर्षाच्या तुलनेत 29 टक्के वाढ अधिक आहे. देशांतर्गत विक्रीची आकडेवारी 1 लाख 96 हजारहून अधिक राहिली आहे. बजाज
ऑटोने 95 टक्के वाढीसह 1 लाख 81 हजार तर रॉयल एनफिल्डने 68 हजार 881 दुचाकी विकल्या आहेत.









