खाऊपिऊ घालण्यासह आणखी एक व्यवस्था
जेव्हा काहीतरी विशेष खायचे असते, तेव्हा लोक रेस्टॉरंटमध्ये जाणे पसंत करतात. तेथे लोक केवळ खाण्यासाठी जात असतात, परंतु खाल्यावर तुम्हाला जर झोपण्याची संधी मिळाल्यास किती चांगले ठरेल याचा विचार करा. तुमची ही इच्छा जॉर्डनच्या एका रेस्टॉरंटमध्ये पूर्ण होऊ शकते.
जॉर्डनची राजधानी अम्मानमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांसाठी खाल्ल्यावर झोपण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. येथील रेस्टॉरंट स्वत:च्या ग्राहकाहंना देशातील नॅशनल डिश (मनसफ) खाल्ल्यावर काही वेळ झोपी जाण्याची व्यवस्था पुरवत आहे. म्हणजेच खाऊन पिऊन झाल्यावर झोपी जा अशी ऑफर आहे.

जॉर्डनची नॅशनल डिश मनसफ अत्यंत ‘मोठा खाद्यपदार्थ’ मानला जातो. यात प्रचंड तूप अन् मांसाचा अंतर्भाव असल्याने लोक या डिशच्या सेवनानंतर आराम करू इच्छितात. अम्मान येथील मुआब रेस्टॉरंटने हीच भावना विचारात घेत बेडची व्यवस्था केली आहे. डिशचा आनंद घेतल्यावर ग्राहकांना आरामात झोपी जाता यावे हा यामागचा उद्देश आहे. आतापर्यंत लोक ही डिश घरातच खात होते, जेणेकरून त्यानंतर झोप घेता येईल.
बेडची व्यवस्था करण्याची कल्पना थट्टेतून सुचली, रेस्टॉरंटच्या इंटीरियरमध्ये बेडची व्यवस्था असावी अशी सूचना लोकांनी केली होती. काह ग्राहकांनी रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांना झोपण्यासाठी बेड ठेवण्यास सांगितले होते. याचमुळे येथे लोकांना झोपता यावे याकरता विशेष हिस्सा निर्माण करण्यात आल्याची माहिती रेस्टॉरंटचे मालक मुसाब मुबेदिन यांनी दिली आहे.









