अडॉप्शनसाठी तयार ब्रिटनमधील मांजर
सध्या एक विशेष प्रकारचे मांजर चर्चेत आहे. हे अनोखे मांजर फ्लोरिडाच्या वारिंग्टन अडॉप्शन सेंटरमध्ये असून लवकरच ते एखाद्या कुटुंबाकडून दत्तक घेतले जाणार आहे. सेंटरच्या स्टाफने या मांजरातील चित्रपटात एका पात्राच्या नावावर ‘नॅनी मॅकफे’ हे नाव दिले आहे. या मांजराचे वैशिष्ट्या म्हणजे याला दोन नाक आहेत. 4 वर्षीय या मांजराचे नाक मोठे असल्याचे प्रथम सेंटरच्या स्टाफला वाटले हेते, परंतु एका वैद्यकीय तपासणीत मांजराला दोन नाक असल्याचे आढळून आले.
दोन नाकांमुळे या मांजराला कुठलीच समस्या होत असून ती सर्वसामान्य मांजरांप्रमाणे जगू शकते. एखाद्या कुटुंबाने मॅकफेला दत्तक घेत तिची देखभाल करावी याकरता आता सेंटर प्रतीक्षा करत आहे.
सेंटरच्या वेटरनरी ऑफिसर ब्रोकबँक यांनी नॅनी मॅकफेला ‘बर्थ डिफेक्टिव्ह’ म्हणतात. या स्थितीला सर्वसाधारणपणे ‘बर्थ डिफेक्ट’ म्हणूनच ओळखले जाते, कारण गर्भातच हा प्रकार घडत असतो. परंतु सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी नॅनी मॅकफेमधील व्यंगाला विशेष स्वरुपात दुर्लभ ठरविले आहे.
नॅनी मॅकफेच्या मागील मालकाने खराब आरोग्य आणि आर्थिक स्थितीमुळे मांजराला सोडून दिले होते. हे मांजर आता नव्या घराची प्रतीक्षा करत आहे. आम्हा सर्वांचे आमच्या अनोख्या नॅनी मॅकफेवर प्रेम जडले आहे, ती येथे लाडकी आहे. आम्ही तिच्या दोन्ही नाकांना पाहत राहतो. मॅकफे प्रचंड खोडकर असून तिला नवे आणि चांगले घर मिळेल अशी अपेक्षा असल्याचे सेंटरच्या व्यवस्थापिका लिंडसे केर यांनी म्हटले आहे.









