20 वर्षांपासून ऑफिसमध्ये येतेय, पण कामच नाही
समानता आणि आर्थिक स्वरुपात स्वतंत्र होण्याचा विचार अनेकदा ऐकला असाल. परंतु केवळ ऑफिसमध्ये पोहाचणे आणि पगार मिळविणे पुरेसे आहे का? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे, कारण फ्रान्समध्ये राहणाऱ्या एका महिलेने स्वत:च्या आरोग्यामुळे ऑफिसमध्ये कुठलेच काम दिले जात नसल्याचा दावा केला आहे.
लोक एकीकडे नोकरीत काम करता करता त्रस्त होऊन जातात आणि दुसरीकडे या महिलेला दररोज ऑफिसला जाऊनही कुठलेच काम दिले जात नसल्याची समस्या आहे. हे सत्र एक किंवा दोन महिन्यापासून नव्हे तर मागील 20 वर्षांपासून सुरू आहे. अखेर वैतागून या महिलेने कंपनी विरोधात खटला दाखल केला आहे.
लॉरेन्स वॅन वॅसेनहोव ही महिला फ्रान्स टेलिकॉममध्ये 1993 मध्ये भरती झाली होती. महिलेला आंशिक स्वरुपात हात आणि चेहऱ्यावर पॅरालिसिस अटॅक आला होता आणि जन्मताच तिला एक आजार होता. अशा स्थितीत तिची अवस्था पाहून तिला काम देण्यात आले होते. 2002 पर्यंत सर्वकाही सुरळीत चालले आणि तिने दुसऱ्या ऑफिसमध्ये बदली करून घेतली. तोपर्यंत फ्रान्स टेलिकॉमचे ऑरेंज नावाच्या कंपनीने अधिग्रहण केले होते. या कंपनीने महिलेला तिच्या समस्या पाहता योग्य पोझिशन दिली नाही. परंतु तिला मागील 20 वर्षांपासून वेळेवर पगार मिळत आहे.
महिलेने स्वत:चे म्हणणे उच्चाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठलाच लाभ झाला नाही. अशास्थितीत कंपनी विरोधात खटला दाखल केला आहे. कंपनी काम देण्याऐवजी कामाशिवाय पगार देण्याचा पर्याय निवडत आहे. अशाप्रकारे नोकरी सोडण्यासाठी भाग पाडले जात असल्याचा दावा महिलेने केला आहे. कंपनीवर तिच्याकडून नैतिक अनाचार आणि वर्कप्लेसवर भेदभावाचा आरोप करण्यात आला आहे. महिलांसाठी उत्तम कार्यसंस्कृती उपलब्ध करत असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.