शहरात भटक्मया कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने महापालिकेने घेतला नसबंदी करण्याचा निर्णय
प्रतिनिधी / बेळगाव
शहरात भटक्मया कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने नसबंदी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, दोन कंत्राटदारांनी निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला आहे. मात्र एका कुत्र्याच्या नसबंदीसाठी महापालिकेला किमान 1650 रुपये मोजावे लागणार आहेत. याबाबतची अधिसूचना केंद्रीय पशुसंगोपन विभागाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भटक्मया कुत्र्यांची संख्या वाढल्याने शहरवासियांना धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्यावेळी वाहनधारक आणि नागरिकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच लहान मुलांवर हल्ला करून जखमी केल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे भटक्मया कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सातत्याने होत आहे. या समस्येचे निवारण करण्यासाठी महापालिकेने कुत्र्यांची नसबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. यापूर्वी 800 ते 1000 रुपये एका कुत्र्याच्या नसबंदीसाठी महापालिकेकडून देण्यात येत होते. मात्र अलिकडे कंत्राटदारांनी 1600 ते 1800 रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे हा दर जास्त असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले होते. नसबंदीचा खर्च जास्त असल्याने मागील 3 वर्षांत नसबंदी मोहीम रखडली होती. पण आता भटक्मया कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने नसबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेने मागविलेल्या नसबंदी निविदा प्रक्रियेत दोन कंत्राटदारांनी सहभाग घेतला आहे. या निविदा अद्याप निश्चित करण्यात आल्या नाहीत. मात्र एका कुत्र्यावर नसबंदी करण्यासाठी किमान 1650 रुपये द्यावेत, अशी सूचना करणारा आदेश केंद्रीय पशुसंगोपन विभागाने प्रसिद्ध केला आहे. 5 एप्रिल रोजी ही अधिसूचना जाहीर केली आहे. निविदा प्रक्रिया निश्चित करतेवेळी दराबाबत मतभेद होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे केंद्रीय पशुसंगोपन विभागाचा आदेश ग्राहय़ धरून निविदा निश्चित करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
लवकरच नसबंदीचा उपक्रम राबविणार कुत्र्याला पकडणे व पकडण्यात आलेल्या ठिकाणी सोडणे याकरिता 200 रुपये आणि नसबंदी शस्त्रक्रिया करून औषधोपचार करण्याकरिता 1450 रुपये असा दर निश्चित केला आहे. त्यामुळे महापालिकेला एका कुत्र्याच्या नसबंदीसाठी 1650 रुपये मोजावे लागणार आहेत. शहरातील कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेकडून लवकरच नसबंदीचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.









