पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फ्रान्स दौरा नुकताच पार पडल़ा त्याची दखल आंतरराष्ट्रीय माध्यमांनी घेतल़ी दौऱ्यात अनेक मुद्दे हाताळले गेल़े त्यापैकी एक महत्त्वाचा मुद्दा जैतापूर अणुउर्जा प्रकल्प हा होय़ रत्नागिरी जिह्यातील राजापूर तालुक्यातल्या माडबन जैतापूर परिसरात सुमारे 1 हजार एकर जमीन संपादन करून ती अणुऊर्जा महामंडळाकडे सुपूर्द करण्यात आली आह़े याला 10 वर्षापेक्षा अधिक काळ गेल़ा भारत व फ्रान्स देशांमध्ये अणु सहकार्य विषय करार वेगवेगळी वळणे घेत असताना या दौऱ्यात आशादायक पावले पडली आहेत़, असे दोन्ही देशांचे म्हणणे आह़े या करारावरील कार्यवाही वेगाने पुढे गेल्यास त्याचा लाभ देशाला होईलच, पण स्थानिक स्तरावर रत्नागिरी जिह्याला वेगळ्याप्रकारे होण्याची शक्यता आह़े या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर उद्योगाला चालना मिळेल़, अशी अपेक्षा बाळगणाऱ्यांना पंतप्रधानांचा दौरा आशादायक आह़े
जैतापूर 6-ईपीआर पॉवर प्लांट प्रकल्पासाठी फ्रान्स आणि भारत अणुऊर्जेच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये जैतापूरमध्ये सहा अत्याधुनिक युरोपियन प्रेशराइज्ड रिअॅक्टर्स (ईपीआर) बांधले जाणार आहेत़ यामुळे विश्वसनीय, परवडणारी आणि कमी-कार्बन ऊर्जा निर्मिती होणार आहे. याशिवाय, दोन्ही देशांनी स्मॉल मॉड्युलर रिअॅक्टर्स आणि प्रगत मॉड्युलर रिअॅक्टर्स वर संशोधन करण्याचे ठरवले आहे. फ्रान्स आणि भारत एकत्रितपणे ऊर्जा क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी आणि जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी पुढे जात आहेत. गेल्या आठवड्यात पॅरिसमध्ये झालेल्या नेत्यांच्या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात जैतापूर ईपीआर प्रकल्पाच्या यशासाठी त्यांच्या वचनबद्धतेवर जोर देण्यात आला आणि आतापर्यंत झालेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीची माहिती देण्यात आली. या उपक्रमाला आणखी पुढे नेण्यासाठी दोन्ही देशांनी आगामी महिन्यात त्यांचे सहकार्य अधिक गतीमान करण्याची योजना आखली आहे. जैतापूर प्लांटची 9.6 गिगावॅटची स्थापना क्षमता त्याला जगभरातील सर्वात शक्तिशाली अणुऊर्जा प्रकल्प हे बिरूद मिळेल़. सुमारे 70 दशलक्ष भारतीय कुटुंबांच्या उर्जेच्या गरजा प्रभावीपणे पूर्ण करण्याचे नियोजन आह़े महत्त्वाचे म्हणजे, हा प्रकल्प कार्बन उत्सर्जनात वार्षिक अंदाजे 80 दशलक्ष टन कार्बन डायऑक्साईड कमी करण्यात योगदान देईल, ज्यामुळे हवामान बदलाला तोंड देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली जाईल. जैतापूर युनिट्सचे बांधकाम आणि कार्यान्वित करणे, तसेच भारतातील आवश्यक परवानग्या आणि संमती यांची जबाबदारी न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने घेतली आहे. भारतीय नियामकाद्वारे या तंत्रज्ञानाच्या प्रमाणीकरणावरही देखरेख होणार आह़े फ्रेंच युटिलिटी कंपनी, प्रकल्पाच्या बांधकाम टप्प्यात गुंतवणूकदार किंवा थेट सहभागी होणार नाही. तथापि, पूरक कौशल्यांचा फायदा घेऊन फ्रेंच आणि भारतीय अणुउद्योगांमध्ये दीर्घकालीन भागीदारी प्रस्थापित करण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे.
सध्या, भारताकडे 23 कार्यान्वित अणुभट्ट्या आहेत, ज्यामध्ये अतिरिक्त आठ बांधकामाधीन आहेत, अणुऊर्जेसाठीची आपली वचनबद्धता त्याच्या ऊर्जा निर्मिती मिश्रणाचा एक महत्त्वाचा घटक आहे. या प्रगत आण्विक तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन, फ्रान्स आणि भारत हवामान बदल आणि ऊर्जा सुरक्षेच्या गंभीर आव्हानांना तोंड देताना हरित आणि अधिक समृद्ध ऊर्जा भविष्याचा मार्ग मोकळा करत असल्याचा दावा करण्यात आला आह़े फ्रान्सचे राष्ट्रप्रमुख मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून, मोदींनी भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त फ्रेंच प्रजासत्ताकच्या राष्ट्रीय दिनानिमित्त सन्माननीय पाहुणे म्हणून ऐतिहासिक भेटीची सांगता केली. 14 जुलै रोजी पॅरिसमधील एलिसी पॅलेसमध्ये नेत्यांनी समोरासमोर आणि शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. दक्षिण फ्रान्समधील निर्माणाधीन असलेल्या ज्युल्स होरोविट्झ अणुभट्टीचा वापर वर्तमान आणि भविष्यातील अणुभट्टीच्या डिझाइनसाठी साहित्य आणि इंधनाच्या चाचणीसाठी केला जाईल. बेल्जियम, झेक प्रजासत्ताक, फिनलंड, फ्रान्स, स्पेन, स्वीडन, यूके आणि युरोपियन कमिशनच्या व आंतरराष्ट्रीय संघाच्या चौकटीत अणुभट्टी बांधली जाणार आहे. एप्रिल 2021 मध्ये, इडीएफने न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडे राज्यातील जैतापूर येथे सहा रिअॅक्टर्स बांधण्यासाठी बंधनकारक तांत्रिक-व्यावसायिक ऑफर सादर केली. ही ऑफर दोन कंपन्यांमधील करारावर 2018 च्या स्वाक्षरीसह सुरू झालेल्या कामाचा परिणाम आह़े ईडीएफ ऑफरमध्ये अणुभट्ट्यांचे तपशीलवार तांत्रिक कॉन्फिगरेशन, साइटच्या परिस्थितीवरील माहिती विचारात घेऊन आणि सहा अणुभट्ट्यांसाठी अभियांत्रिकी अभ्यास आणि उपकरणे पुरवण्यासाठी अटी व शर्तींचा समावेश आहे. संयुक्त निवेदनात म्हटले आहे, की ईपीआर तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या प्रकल्पांसाठी भारतातील नागरी अणु अभियंते आणि तंत्रज्ञांना प्रशिक्षण देण्याच्या ईडीएफच्या प्रस्तावाचे देशांनी स्वागत केले. स्किल इंडिया उपक्रमाच्या अनुषंगाने, संबंधित फ्रेंच संस्था अणु क्षेत्रातील प्रशिक्षण मजबूत करण्यासाठी भारतीय समकक्षांसोबत काम करतील आणि भारतीय विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिपला प्रोत्साहन आणि सुविधा देण्याचे योजण्यात आले आह़े
कोणताही प्रकल्प उभारला जात असताना तंत्रज्ञान, आर्थिक योजना, कौशल्य आदी बाबी महत्त्वाच्या आहेत़ परंतु प्रकल्पाचे अप्रत्यक्ष परिणाम म्हणून स्थानिक बाजारपेठेत होणारे परिणाम लक्षणीय आहेत़ तरूणांच्या अंगी असलेल्या कौशल्याला वाव मिळवून अशा कौशल्यातून मोठी कामगिरी होण्यास संधी आह़े मुंबईतील वीर माता जीजाई तंत्रज्ञान संस्थेला मनुष्यबळ प्रशिक्षित करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आह़े 2500 तरूणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरूपात या प्रकल्पातून रोजगार मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आह़े भारतीय संस्थांनी फ्रान्सच्या प्रशिक्षण संस्थांकडून आवश्यक ते तंत्रज्ञान मिळविण्याविषयी देखील दोन्ही देशांचे एकमत झाले आह़े त्यासाठी प्रारंभिक बैठका पार पडल्या आहेत़ आता हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागल्यास स्वच्छ उढर्जा, रोजगार असे अनेक मुद्दे एकाचवेळी पुढे जातील, अशी अपेक्षा बाळगण्यात येत आह़े
सुंकांत चक्रदेव








