6800 रु. प्रतिक्विंटल दर : पाऊस-रोगराईमुळे उत्पादन क्षेत्रात घट
बेळगाव : पावसाअभावी यंदा जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विविध पिकांच्या पेरणी क्षेत्रात मोठी घट झाली आहे. जोंधळा पेरणीचे क्षेत्र घटले आहे. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात जोंधळ्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. जोंधळा प्रतिक्विंटल 6 हजार रुपये झाला आहे. पावसाचा अभाव आणि वाढता खर्च यामुळे पेरणी क्षेत्रात घट झाली आहे. यंदाच्या हंगामात 10.50 लाख हेक्टर क्षेत्रात जोंधळा पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी 7.40 लाख हेक्टरात पेरणी झाली आहे. त्यामुळे यंदा 3 लाखांहून अधिक हेक्टर पेरणीच्या क्षेत्रात घट झाली आहे. पावसाअभावी आणि रोगराई व इतर कारणांमुळे ज्वारी उत्पादनात घट झाली आहे. काही प्रमाणात पेरणी झाली आहे. मात्र अपेक्षित उत्पादनापासून दूर रहावे लागणार आहे. त्यामुळे उत्पादकांना देखील चिंता लागली आहे. विशेषत: जोंधळ्याच्या भाकरी केल्या जातात. त्यामुळे हॉटेल, मेस आणि इतर व्यावसायिकांनाही याची झळ बसणार आहे. त्यामुळे यंदा भाकरी महाग होण्याची शक्यता आहे.
रब्बी हंगामात उत्पादन होईल-शिवनगौडा पाटील
यंदा पावसाअभावी उसासह इतर पीक उत्पादनावर परिणाम झाला आहे. जोंधळा उत्पादनात घट झाली आहे. मात्र रब्बी हंगामात उत्पादन होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र सध्या बाजारात जोंधळ्याच्या किंमती वाढल्या आहेत.









