प्रतिनिधी/ बेळगाव
धर्मगुरु मुफ्ती सलमान आझरी यांच्या सुटकेसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मुस्लीम बांधवांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून महसूल निरीक्षक एस. एम. परगी यांना निवेदन सादर केले.
धर्मगुरु मुफ्ती सलमान आझरी यांना अटक करण्यात आले असून त्यांच्यावर राजकीय द्वेषातून आरोप करण्यात येत आहे. कायद्याचा दुरुपयोग करून त्यांना प्रकरणात गोवण्यात येत आहे. त्यांची त्वरित सुटका करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तर केंद्र सरकारकडून वक्मफ बोर्डच्या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. यामुळे अल्पसंख्यांकांच्या हक्कांवर गदा येणार आहे. घटनात्मक हक्काचे उल्लंघन आहे, हे त्वरित थांबविण्यात यावे. कोणत्याही गुन्ह्यात सापडल्यानंतर त्यासाठी लागणारी आवश्यक ती कायद्याची तत्वे न पाळताच अनेकांना जेलमध्ये डांबले जात आहेत. हे कायद्याच्या विरोधात असल्यामुळे अल्पसंख्यांकांच्या हक्कांवर गदा येत आहे.
वक्फ बोर्डाच्या मालमत्तांमध्ये हस्तक्षेप करून सरकार एका विशिष्ठ समाजाच्या अधिकाऱ्यांवर गदा आणत आहे. हे घटनात्मक हक्काचे उल्लंघन असून सरकारने असे प्रकार त्वरित थांबवावेत. कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करावी. सरकारने याची त्वरित दखल घेऊन धर्मगुरु मुफ्ती सलमान यांची सुटका करून न्याय द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.









