मार्कंडेय साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी शेतकरी बचाव गटाचा जोरदार प्रचार
वार्ताहर /किणये
काकती येथील मार्कंडेय साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पदासाठी चुरशीने मतदान होणार आहे. रविवार दि. 27 रोजी ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत शेतकरी बचाव पॅनेल कारखान्याचे उपाध्यक्ष तानाजी पाटील व आर. आय. पाटील यांच्या गटाला तालुक्याच्या ग्रामीण भागातून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकरी बचाव पॅनेलला निवडून देण्याचा निर्धार तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकरी बचाव पॅनेलमधून 15 उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. या पॅनेलच्या उमेदवारांना शहरासह ग्रामीण भागातून पाठिंबा वाढत आहे. शेतकऱ्यांसाठी तळमळीने कार्य करणाऱ्या शेतकरी बचाव तानाजी पाटील गटाला विजयी करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकरी बचाव पॅनेलमधून सामान्य गटातून जोतिबा नागेंद्र आंबोळकर, भाऊराव जयवंतराव पाटील, मल्लाप्पा तवनाप्पा पाटील, युवराज केदारी हुलजी, रामचंद्र (आर. आय.) पाटील, शिवाजी वासुदेव कुट्रे, सिद्धाप्पा भरमा टुमरी हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
तर अनुसूचित जाती (एस. सी.) गटातून परशुराम शट्याप्पा कोलकार निवडणूक लढवीत आहेत. अनुसूचित जमाती (एस.टी.) गटातून लक्ष्मण शिवाजी नाईक, महिला गटातून वनिता सुरेश अगसगेकर, वैष्णवी वसंत मुळीक या रिंगणात आहेत. मागासवर्गीय अ गटातून बसवराज दुंडाप्पा गणिगेर तसेच आर्थिक मागास ब गटातून तानाजी मिनू पाटील व बिगर ऊस उत्पादक ड गटातून बाबासाहेब भेकणे व सहकारी संघ ब गटातून सुनील अष्टेकर रिंगणात आहेत. शुक्रवारी सकाळी कडोली, कंग्राळी खुर्द, कंग्राळी बुद्रुक, होनगा, काकती, सावगाव, उचगाव, बाकनूर, बेळवट्टी, बडस, वाघवडे, बेनकनहळ्ळी, नावगे, जानेवाडी, किणये, कर्ले, बिजगर्णा, बेळगुंदी, सोनोली, सावगाव, मंडोळी, मजगाव, येळ्ळूर यासह वडगाव, शहापूर, अनगोळ भागात जोरदार प्रचार करण्यात आला. मार्कंडेय साखर कारखाना हा शेतकऱ्यांचा आहे. तो शेतकऱ्यांच्या हातात दिला पाहिजे. यासाठी बचाव पॅनेलच्या सर्व उमेदवारांना विजयी केले पाहिजे, असे आवाहन एपीएमसी माजी सदस्य आर. के. पाटील यांनी केले. या कारखान्याचा अधिक विकास होण्याची गरज आहे. त्यासाठी शेतकरी बचाव पॅनेलला भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन माजी महापौर शिवाजी सुंठकर व मनोज पावशे यांनी केले. या पॅनेलच्या सर्व उमेदवारांनी शुक्रवारी म. ए. समितीचे नेते व शेतकऱ्यांचे नेते रमाकांत कोंडुसकर यांची भेट घेतली व शेतकरी बचाव गटाला सहकार्य करण्याची विनंती केली.









