पांगुळ गल्लीतील अपघाताने हेस्कॉमला फटका
प्रतिनिधी/ बेळगाव
भरधाव कारची रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या ऑटोरिक्षा व दुचाकीला धडक बसली. पांगुळ गल्लीत झालेल्या या अपघातानंतर कार विद्युत ट्रान्स्फॉर्मरला आदळल्याने हेस्कॉमचेही नुकसान झाले आहे. या अपघातात कोणालाही इजा पोहोचली नाही.
शनिवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून सायंकाळी वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात कारचालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हेस्कॉमचे सुमारे 80 हजार रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.









