प्रतिनिधी/ बेळगाव
हुबळी-दादर-हुबळी या मार्गावर विशेष रेल्वे फेरी धावणार आहे. सध्या होत असलेली गर्दी टाळण्यासाठी रेल्वे फेरी सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांनी या रेल्वे फेरीला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या रेल्वेला एकूण 12 डबे जोडण्यात आले आहेत. रविवार दि. 12 रोजी दुपारी 3.35 वा. हुबळी येथून निघालेली रेल्वे 7.20 वा. बेळगावला तर दुसऱ्या दिवशी सकाळी 11.45 वा. दादरला पोहोचेल. सोमवार दि. 13 रोजी दुपारी 1.05 वा. दादर येथून निघालेली एक्स्प्रेस रात्री 2.20 वा. बेळगावला तर पहाटे 5.30 वा. हुबळीला पोहोचणार आहे.









