अष्टपैलू कामगिरीने अनेकांची जिंकली मने
प्रवीण जाधव/रत्नागिरी
कोकणाने देशाला अनेक दिग्गज क्रिकेट खेळाडू दिले आहेत. यामध्ये सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, संजय मांजरेकर, दिलीप वेंगसरकर आदींचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल़ मात्र हे खेळाडू मुळचे कोकणातील असले तरी त्यांच्या खेळाची सुऊवात मुंबईत झाली होत़ी कोकणातील सुविधांची कमतरता असताना देखील अविराज गावडे या रत्नागिरीच्या सुपुत्राने थेट कौंटी क्रिकेटमध्ये खेळण्याचा बहुमान पटकावला आह़े त्या ठिकाणी त्याची चमकदार कामगिरी होत असून रत्नागिरीचे नाव इंग्लडच्या कौंटी क्रिकेटमध्ये झळकत आह़े
अविराज याच्या खेळाची सुऊवात वयाच्या पाचव्या वर्षापासून झाल़ी वडील अनिल गावडे यांनी त्याला रत्नागिरीतील छोटू चव्हाण क्रिकेट अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवल़े लहानपणापासून खेळाची आवड असलेल्या अविराज याने या ठिकाणी चमकदार खेळ करत सर्वांचेच लक्ष आकर्षित केल़े शहरातील जीजीपीएस येथे शालेय शिक्षण घेतलेल्या अविराज याची 14 वर्षाखालील शालेय संघात निवड झाल़ी त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्हा क्रिकेट संघातही त्याने स्थान पटकावल़े अविराज हा उजव्या हाताचा फलंदाज असून लेग ब्रेक गोलंदाज आह़े
यावेळी धुळे येथे झालेल्या 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत अविराज याने तब्बल 10 विकेट घेवून विक्रम प्रस्थापित केल़ा त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होत़े यानंतर 16 वर्षाखालील क्रिकेट संघात खेळताना त्याची निवड कर्णधार म्हणून करण्यात आल़ी त्याच्या खेळाचे कसब पाहून त्याची निवड एमसीए व झेडसीएच्या संघात करण्यात आल़ी मुलामध्ये असलेले खेळाचे गुण पाहून वडिलांनी कोल्हापूर येथील राष्ट्रप्रेम क्रिकेट अॅकॅडमी येथे प्रशिक्षणासाठी पाठवल़े
त्यानंतर अविराज याने कधीही मागे वळून पाहिले नाह़ी पुणे, मुंबई या ठिकाणी त्याची कायमच सरस कामगिरी ठरत आल़ी मुंबई येथे खेळताना त्याची इंग्लंडच्या कौंटी क्रिकेटमध्ये झाल़ी चार महिन्यांच्या या स्पर्धेत तो एकूण 16 वनडे व 16 चार दिवसीय सामने खेळणार आह़े अविराज याचे वडील सांगतात की, त्याला लहानपणापासून क्रिकेटची आवड होत़ी शालेय जीवनापासून क्रिकेट हा त्याचा आवडीचा मार्ग त्याने निवडल़ा खेळातील त्याची जिद्द, चिकाटी व मेहनतीमुळे आज देश-परदेशात तो चमकत आह़े रत्नागिरीच्या क्रिकेट क्षेत्रातील हा उगवता तारा भविष्यात रणजी व नंतर भारतीय संघातही आपले स्थान निश्चित करेल, अशी आशा व्यक्त केली जात आह़े
कौंटीच्या पहिल्या तीन सलगच्या सामन्यात सामनावीराचा बहुमान
कौंटी क्रिकेटच्या पहिच्या सामन्यात अविराज याने 34 चेंडूत 42 धावा केल्य़ा तर गोलंदाजी करताना 9 षटकात 2 बळी घेतल़े त्याच्या या कामगिरीबाबत त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आल़े तर दुसऱ्या सामन्यातही तो हर्लिग्टन मिडोजविऊद्ध खेळताना अविराज याने 53 चेंडूत 70 धावा केल्य़ा तर 9 षटकात 2 बळी मिळविल़े तसेच दोन धावबाद व दोन अतिमहत्वाचे झेल अविराज याने घेतल़े मिडलसेक्स विऊद्ध राजेटस पार्क सामन्यात अविराज याने उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत 16 धावा देवून 4 बळी घेतल़े अशाप्रकारे अविराज हा सलग तीन सामन्यात सामनावीर ठरल़ा
स्थानिक कामगिरी
- 14 व 16 वर्षाखालील जिल्हा संघाचा कर्णधार.
- धुळे येथे 10 बळी मिळवत केला विक्रम.
- शालेय स्पर्धांमध्येही चमकदार कामगिरी.
- 19 वर्षाखालील इनव्हिटेशन लिगमध्ये 23 बळी व एक अर्धशतक.
- 19 वर्षाखालील महाराष्ट्र संघात स्थान मिळविण्याचा बहुमान.









