प्रतिनिधी/ बेंगळूर
काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात सैन्यदलाचे वाहन दरीत कोसळून घडलेल्या दुर्घटनेत राज्यातील पाच जवानांचा मंगळवारी मृत्यू झाला. यात राज्यातील तीन जवानांचा समावेश आहे. उडुपीच्या कुंदापूर तालुक्यातील बिजाडी येथील जवान अनुप पुजारी यांचा देखील अपघाती मृत्यू झाला. अनुप यांचे पार्थिव गुरुवारी मंगळूरला आणल्यानंतर बिजाडी येथे नेण्यात येण्याची शक्यता आहे. अनुप यांचे शिक्षण झालेल्या प्राथमिक शाळेच्या आवारात त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल. आमदार एन. किरणकुमार कोड्गी, उपविभागाधिकारी महेशचंद्र, तहसीलदार एच. एस. शोभालक्ष्मी यांनी अनुप यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.









