हिमाचल प्रदेशमध्ये मिळालेल्या यशा नंतर कॉंग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. पण आज दुसऱ्या दिवशी निवडणुकीतील विजयाचा उत्साह मागे पडला असून काँग्रेसने आता मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यासाठी चाचपणी सुरु केली आहे.
राज्यातील सर्व कॉंग्रेस नेत्यांना आणि इतर सहयोगी गटांना स्वीकारार्ह उमेदवार शोधण्यासाठी काँग्रेसचे नेते प्रयत्नशील आहेत. ही जबाबदारी राज्याचे प्रभारी राजीव शुक्ला, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर हुडा या तीन वरिष्ठ नेत्यांवर असून त्यांनी आज राज्य युनिटच्या प्रमुख प्रतिभा सिंह यांची भेट घेतली. प्रभारी राजीव शुक्ला माध्यमांशई बोलताना म्हणाले”आम्हाला बहुमत मिळाले आहे…आम्ही लोकांच्या आकांक्षा पूर्ण करू. निवडून आलेल्या आमदारांना बोलावून एक बैठक घेतली आहे…पण पक्षाचे निर्णय दिल्लीतून घेतले जातील.”
मुख्यमंत्री पदासाठी माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंग यांनाही एक प्रमुख दावेदार मानले जाते. दुसरीकडे, मुख्यमंत्रीपदाचे दुसरे सर्वात मोठे दावेदार सुखविंदर सुक्खू यांचे समर्थक आमदारही काँग्रेस कार्यालयात दाखल झाले. इतर दावेदार धनीराम शांडिल व राजेंद्र राणा काँग्रेस कार्यालयात पोहोचलेत.
प्रतिभा सिंह यांच्या उत्साहित समर्थकांनी काँग्रेस कार्यालयाला घेराव घालून बघेल यांची गाडीही घेराव घालून रोखून धरली. यावेळी समर्थकांनी प्रतिभासिंग यांच्या नावाचा जयघोष करून मुख्यमंत्री करण्याची मागणी केली. सुखविंदर सुक्खू यांच्या समर्थकांसोबत धक्काबुक्की झाल्यामुळे वातावरण तापले होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









