वृत्तसंस्था/ कोलंबो
येथे सुरू होणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेपूर्वीच यजमान लंकन संघाला फार मोठा धक्का बसला आहे. लंक संघातील प्रमुख चार खेळाडू दुखापतीने त्रस्त झाले आहेत. तर अविष्का फर्नांडोला तसेच परेरा यांना कोरोनाची बाधा झाल्याचे वैद्यकीय चाचणीत आढळून आले आहे. वेगवान गोलंदाज डी. चमीरा तसेच हसरंगा यांना दुखापती झाल्या आहेत.
चमेराला अलिकडेच लंका प्रिमीयर लीग क्रिकेट स्पर्धेत खेळताना खांद्याला दुखापत झाली होती. त्याचप्रमाणे हसरंगालाही दुखापत झाल्याने तो जायबंदी झाला होता. चमेरा आगामी आशियाई चषक क्रिकेट स्पर्धेत खेळण्याची शक्यता दुरावली आहे. दरम्यान कुशल परेरा आणि अविष्का फर्नांडो यांना कोरोनाची बाधा झाली असून ते कोरोना चाचणीत पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले आहे. या दोन्ही खेळाडूंवर वैद्यकीय इलाज चालू असून त्यांना पुन्हा या स्पर्धेपूर्वी कोरोना चाचणी द्यावी लागेल. आगामी आशियाई चषक क्रिकेट स्पर्धेत यजमान लंकेचा सलामीचा सामना 31 ऑगस्टला पल्लीकेल्ली येथे बांगलादेश बरोबर होणार आहे.









