कारवार : येथून जवळच्या सीबर्ड नाविक दल प्रदेशातील तग ला आग लागल्याची घटना आज गुरुवारी घडली. तगमध्ये मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे लक्षात येताच, नाविक दलाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तग वर धाव घेऊन आग आटोक्यात आणली आणि मोठी दुर्घटना टळली. आगीमुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात वित्तीय हानी झाल्याचे सांगण्यात आले.
दुर्घटनाग्रस्त तग चे नाव तेज आहे. जहाजे ओढून आणण्याचे कार्य तग कडून केले जाते. त्यांच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे समजते.









