शिराळा/ प्रतिनिधी
तालुक्यातील मणदूर येथे शुक्रवारी सकाळी गव्याने केलेल्या हल्ल्यात अशोक विष्णू सोनार हे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना वारणा डाव्या कालव्याच्या जवळ असणाऱ्या काळंबाच्या मंदीरा जवळ सकाळी आठच्या सुमारास घडली.
दोनच दिवसांपूर्वी एक शाळकरी मुलगा गव्याच्या हल्ल्यामध्ये थोडक्यात बचावला होता. जखमी अशोक सोनार यांच्यावर मणदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी कराड येथे पाठवण्यात आले आहे. घटनास्थळी वनपाल एच. ए. गारदी यांनी भेट दिली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.