एनएसएस शिबिरात वाली यांचे प्रवचन
वार्ताहर /नंदगड
निसर्गाने मानवाला भरभरुन दिलेले आहे. मात्र माणूस निसर्गाने दिलेल्या देणगीकडे कानाडोळा करुन धनसंपत्ती जमा करण्याच्या पाठीमागे लागला आहे. नशिबाने मिळालेल्या धनाचा केवळ आपल्यापुरता वापर न करता त्याचा दुसऱयांच्या हितासाठी उपयोग करण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाच्या अंगी आल्यास जगात संघर्ष राहणार नाही, असे वक्तव्य नंदगड रुरल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सी. जी. वाली यांनी अध्यक्षस्थानावरुन बोलताना केले. नंदगड महात्मा गांधी पीयु कॉलेजचे एनएसएस शिबिर हेब्बाळ येथे सोमवारपासून सुरू झाले आहे. अध्यक्षस्थानी एनआरई सोसायटीचे चेअरमन सी. जी. वाली होते.
यावेळी हेब्बाळ ग्रा. पं. च्या अध्यक्षा मल्लव्वा मादार, पीडीओ आरती अंगडी, हेब्बाळ प्राथमिक शाळेचे एसडीएमसीचे अध्यक्ष विठ्ठल राऊत, सदस्य विश्वनाथ केसरेकर, मोहन गुरव, गीता गुरव, विनोद गुरव, दत्ताराम गुरव, प्रिया गुरव, सुषमा गुरव, कविता गुरव, प्राचार्य एम. के. बजंत्री, प्रा. डी. एस. कटगी आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांची विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी भाषणे झाली. आठवडाभर शिबिर चालणार आहे.









