मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ; कैद्यासाठी गोशाळा, सॅनिटरी पॅड बनविण्याच्या मशीनचे उद्घाटन, विविध स्वावलंबी उपक्रमांना सुऊवात
म्हापसा : कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात आता स्वावलंबी सुधारणा केंद्र उभारण्यात येणार असून त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते करण्यात आले. या स्वावलंबी सुधारणा केंद्र अंतर्गत येथे नव्याने गोशाळा बांधण्यात आली आहे. आणि विशेष म्हणजे महिलांसाठी सॅनिटरी पॅड बनविण्याचे मशीन आणण्यात आले असून महिला वर्ग येथे सॅनिटरी पॅड बनविणार आहे. त्यांची विक्रीही येथे करण्यात येणार आहे. याशिवाय गोबर गॅस आदी सुधारात्मक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात या बांधकामाचे रितसर नामफलकाचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री प्रसार माध्यमाशी बोलत होते. यावेळी पोलीस महानिरीक्षक तथा तुऊंग महानिरीक्षक ओमवीर सिंग, कोलवाळचे अधीक्षक गौरेश कुर्टीकर, साहाय्यक महानिरीक्षक वासुदेव शेट्यो आदी अधिकारी उपस्थित होते.
कारागृहात सुधारात्मक उपक्रम
भविष्यात या थेट गोठ्यातून कैद्यांना दुधाचापुरवठा केला जाईल तसेच जी गोबर गॅसची निर्मिती केली जाईल त्यामुळे गॅस सिलिंडरची गरजही पूर्ण होईल. कैद्यांची सुटका करताना त्यांची संपूर्ण सुधारणा व्हावी या उद्देशाने कारागृहात शिवण कला, कागदी पिशव्या बनवणे, सुतारकाम, भांडी, शिलाई मशिन उपक्रम असे विविध सुधारात्मक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. ज्यामुळे कैद्यांची सर्जनशीलता दिसून येईल. कारागृह परिसरात हे सुधारात्मक उपक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी मदत केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी हस्तकला, वस्त्र आणि काथ्या आणि वस्त्राsद्योग विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था, उत्तर गोवा यांचे कौतुक केले.
योग प्रशिक्षण देण्याची योजना
कारागृहातील कैद्यांसाठी ध्यान कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मॅवेरिक फर्नांडिस आणि त्यांची टीम इंडिया (गोवा युनिट) कॅरिटास कार्यरत असेत तसेच ब्रह्माकुमारी यांनी कैद्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि त्यांना निरोगी आणि सकारात्मक ठेवण्यासाठी ध्यान आणि योगाचे आयोजन केले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून कारागृहाची पाहणी
कार्यकारी तुऊंग कर्मचाऱ्यांच्या गणवेशासाठी लावलेल्या आर्म बॅजचेही मुख्यमंत्र्यांनी प्रकाशन केले. मुख्यमंत्र्यांनी कोलवाळ कारागृहातील विविध कक्षांना भेट दिली आणि कोलवळ कारागृहात सुऊ असलेल्या विविध सुधारणात्मक उपक्रमांची पाहणी केली. भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी कैद्यांशी आणि तुऊंग कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि कारागृहात समर्पणाने केलेल्या सुधारात्मक उपक्रमांसाठी सर्वांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. कारागृहातूनच (इग्न्यू) घ्उऱ्ध्ळ आणि ‘निऑस’ ऱ्घ्ध्ए मार्फत बाह्य शिक्षण घेत असताना टेडमध्ये प्रथम क्रमांकावर आलेल्या कैद्यांना म्हणजे बॅचलर पदवी, पदव्युत्तर पदवी, दहावी इयत्तेतील कैद्यांना ‘सर्टिफिकेट ऑफ मेरिट’ प्रदान करण्यात आले.
तऊंग महानिरीक्षकांकडून विविध सुविधांची माहिती
मेळाव्याला संबोधित करताना तुऊंग महानिरीक्षक ओमवीर सिंग बिŽाsई, आयपीएस यांनी कोलवाळ कारागृहात ‘गो ग्रीन प्रोजेक्ट’ सारख्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. ते म्हणाले की, संपूर्ण छतावर सौर पॅनलची रचना उपलब्ध करून दिली आहे. कोलवळे कारागृह जे हरित उर्जा निर्मितीसाठी खूप मोठा पल्ला गाठेल आणि त्याद्वारे वीज बिल ‘शून्य’पर्यंत कमी होण्यास मदत करेल. अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी मॉडर्न सेंट्रल जेल कोलवाळचे अधीक्षक गौरेश कुर्टीकर उपस्थित होते.
कैद्यांना शिस्तीचे धडे देणारे : मुख्यमंत्री
यापूर्वी कोलवाळ मध्यवर्ती ठिकाणी गैरकृत्य होत होती. आता येथे तुऊंग महानिरीक्षक पद खाकी वर्दीकडे सोपविण्यात आले आहे. पूर्वी तुरुंग महानिरीक्षकांकडे ताबा होता. आता गेल्या 3 महिन्यात येथे मोठा बदल दिसून येत असून खाकी वर्दीमुळे येथे शिस्तीकडे या खात्याने अधिक भर दिला आहे. येथे सर्वांना शिस्त लागणे काळाची गरज असून या पुढे येथे अन्य बदलही घडवून येणार आहे. अशी माहिती पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.









