गोवा प्रदेश काँग्रेसची टीकार
पणजी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याची कृती म्हणजे लोकशाहीचा खून असून हा देशासाठी दु:खदायक व काळा दिवस असल्याची टीका गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर व विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी केला आहे. पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, देशातील लोकशाहीला भाजपापासून मोठा धोका असल्याचे हे एक ताजे उदाहरण आहे. सरकारी यंत्रणेचा गैरवापर आणि दुऊपयोग कऊन मोदी सरकारने राहुल गांधी यांना अपात्र ठरवले हा देशासाठी मोठा धक्का आहे. ही एकाधिकारशाही असून भाजपच्या नेत्यांवरही ती पाळी आज ना उद्या येणार आहे, याचे भान त्यांनी ठेवावे असा इशारा काँग्रेस पक्षाने दिला आहे. देशातील ज्वलंत मुद्दे पुढे आणून गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुऊ केली. महागाई, बेकारी व इतर महत्त्वाचे विषय घेऊन ते काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत फिरले. त्या यात्रेचा भाजपने मोठा धसका घेतला आणि ती यात्रा यशस्वी झाली म्हणून हा एक प्रकारे गांधी यांच्यावर सूड उगवल्याची टीका पाटकर व आलेमांव यांनी केली. त्या यात्रेच्या चुकीच्या बातम्या भाजपने पसरवल्या आणि जनतेत फूट पाडण्याचा प्रयत्न केला, असेही ते म्हणाले. मोदी सरकारच्या या कृतीचा काँग्रेस पक्षाने निषेध केला असून अदानीबाबतचा प्रश्न संसदेत उपस्थित केला म्हणून मोदींनी ही कृती केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.









