वारणानगर / प्रतिनिधी
मोठ्या लाभाच्या लालसेने कोट्यावधी रुपये गुंतवणूकीची माया जमा करणाऱ्या ए. एस. ट्रेडर्स कंपनीचा भागीदार असलेल्या बहिरेवाडी (ता. पन्हाळा) बाबू पार्क येथे राहणाऱ्या बाळासो कृष्णात धनगर वय ५५ याला आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने राहत्या बंगल्यावर छापा टाकून झाडाझडती घेत रात्री उशिरा अटक केली असल्याची माहीती तपास अधिकारी स्वाती गायकवाड यांनी दिली.
दरम्यान दुसरा भागीदार बाबासो भूपाल धनगर वय ३३ याला पहाटे नांदेडहून अटक केली आहे.यावेळी महागड्या दोन चारचाकी जप्त केल्या आहेत असेही स्वाती गायकवाड यानी सांगीतले.
कोल्हापूर जिल्हयात कमी कालावधीत मोठा परतावा देण्याचे अमिष दाखवत गुंतवणूक दारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एएस ट्रेडर्स कंपनीचा भागीदार म्हणून काम करणांऱ्या बाळासो धनगर व बाबासो धनगर या सख्या चुलत बंधूनी अनेक आमिषे दाखवून अनेक धनिकांन या जाळ्यात ओढले आहे यातून कोटी रुपयांची माया जमवली आहे. या बद्दल त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.
पण काही दिवस मूळ गाव नेर्ली तामगाव ( ता.करवीर ) असणाऱ्या या प्रकरणातील हे दोन्ही धनगर बंधू एजंट सापडत नव्हते आज तपास अधिकारी स्वाती गायकवाड यांच्या पथकाने बाबासो धनगर याला पहाटे अटक केली तर त्याच्याकडून चुलत भाऊ संशयीत आरोपी बाळासो धनगर हा बहिरेवाडी ता पन्हाळा येथील बाबूपार्क येथे राहत असल्याची माहीती मिळताच सांयकाळी ४ वाजता अलीशान बंगल्यावर छापा टाकून कागदपत्राची तपासणी केली यामध्ये मोठी माया जमवल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी २ अलिशान चारचाकी गाडया व एक बुलेट जप्त केली आहे. रात्री उशिरापर्यंत त्याच्या बंगल्याची झाडाझडती सुरु होती.
बाळासो धनगर हा कोडोली येथील मनुग्राफ कंपनीत कामास होता ती कंपनी सुमारे दहा वर्षापूर्वी बंद पडल्यानंतर त्याने या एएस ट्रेडर्स व त्याच्या संलग्न कंपन्यात अनेक लोकांची फसवणूक झाली. गेली १० वर्षापासून तो बाबूपार्क बहिरेवाडी येथे अलीशान बंगल्यात राहत आहे पन्हाळा तालुक्यात या दोन धनगर बंधूचा संपर्क असल्याने मोठया प्रमाणात फसवणूक झाल्याने हा अकडा कोटीत असल्याचे तपास अधिकारी स्वाती गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कोडोली वारणेत कोट्यावधी रुपयांची गुतंवणूक …
ए.एस. ट्रेडर्स या कंपमीला माया जमवून देणारे अनेक एजंट आहेत या एजटांच्या माध्यमातून निव्वळ वारणा – कोडोली परिसरातून कोट्यावधी रुपये जमा केले आहेत या एजंटानी गुतंवणूकदाराना रक्कम सुरक्षित आहे पोलीसानी खाते शील केले आहेत तो तपास संपल्यावर पैसे परत दिले जातील असे आश्वासन दिल्याने गुतंवणूकदार शांत आहेत तथापी मोठा गदारोळ उठण्याची शक्यता आहे. बहिरेवाडी ता. पन्हाळा येथे ए.एस.ट्रेडर्स चे भागीदार यांचा अलिशान बंगला यावेळी तपास अधिकारी स्वाती गायकवाड सोबत संशयीत आरोपी बाळासो कृष्णा धनगर व बाबासो धनगर









