प्रतिनिधी, कोल्हापूर, वारणा
गुंतवणूकीवर अल्पावधीत चांगला परतावा देण्याच्या आमिषाने नागरीकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या ए.एस.ट्रेडर्सच्या दोघांना आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने मंगळवारी अटक केली.बाबासो भूपाल धनगर (वय- 30)आणि बाळासो कृष्णात धनगर (वय -55, दोघे रा.बहिरेवाडी,ता.पन्हाळा)अशी दोघांची नावे आहेत.बाबासो याला पोलिसांनी नांदेडमधून अटक केली,तर बाळासो याला बहिरेवाडी येथील घरातून जेरबंद करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की,गुंतवणूकीवर अल्पावधीत चांगला परतावा देण्याच्या आमिषाने नागरीकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या ए.एस. ट्रेडर्सकंपनीसह संचालक अशा 28 जणांवर नोव्हेंबर 2022 मध्ये शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.यावेळ पासून कंपनीचे संचालक पसार झाले होते.त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे कामही सुरु करण्यात आले आहे.या सर्व संशयीतांचे जामिन न्यायालयाने फेटाळले आहेत.काही दिवसानंतर हा गुन्हा आर्थिक गुन्हे अन्वेषणकडे वर्ग करण्यात आला.एएस ट्रेडर्स फसवणुकीच्या गुह्याचा तपास गतिमान झाला असून,सोमवारी दोन संचालकांना अटक केली. नांदेडमधील वजिराबाद पोलिस ठाण्यात जानेवारी 2023 मध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून नांदेड पोलिस एएस.ट्रेडर्सच्या पाच संशयितांच्या मागावर होते.त्यापैकी बाबासो धनगर हा आठवड्यापूर्वी नांदेड पोलिसांच्या हाती लागला.कोल्हापुरातील गुह्यातही त्याचा सहभाग असल्याने आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सोमवारी (दि-7) रात्री नांदेड पोलिसांकडून त्याचा ताबा घेतला. मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता,त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी बहिरेवाडी येथून दुसरा संशयित बाळासो धनगर याला मंगळवारी दुपारी अटक केली.त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले जाईल.
बाबासो हा नांदेडमधील कंपनीचा संचालक आहे,तर बाळासो हा कोल्हापुरातील एएस ट्रेडर्सचा संचालक आहे.गुन्हे दाखल होताच अटक टाळण्यासाठी हे दोघे पळाले होते. अखेर आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या निरीक्षक स्वाती गायकवाड यांच्या पथकाने दोन्ही संचालकांच्या मुसक्या आवळल्या.दोघांच्या अटकेमुळे गुह्यातील महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.
पहाटेच्या सुमारास छापा,दोन चारचाकी जप्त
नेर्ली तामगाव (ता.करवीर )असणाऱ्या या प्रकरणातील हे दोन्ही धनगर बंधू एजंट सापडत नव्हते आज तपास अधिकारी स्वाती गायकवाड यांच्या पथकाने बाबासो धनगर याला पहाटे अटक केली.तर त्याच्याकडून चुलत भाऊ संशयीत आरोपी बाळासो धनगर हा बहिरेवाडी ता पन्हाळा येथील बाबूपार्क येथे राहत असल्याची माहीती मिळताच सांयकाळी 4 वाजता अलीशान बंगल्यावर छापा टाकून कागदपत्राची तपासणी केली यामध्ये मोठी माया जमवल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी 2 अलिशान चारचाकी गाडया व एक बुलेट जप्त केली आहे. रात्री उशिरापर्यंत त्याच्या बंगल्याची झाडाझडती सुरु होती.









