वृत्तसंस्था/ पॅरीस
युरोपियन चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेसाठीच्या सुरू असलेल्या पात्र फेरीच्या सामन्यात फिनलँडने कझाकस्तानचा 1-0 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला. या विजयामुळे फिनलँडचा संघ आता पात्रतेच्या समीप पोहोचला आहे. या सामन्यातील एकमेव निर्णायक गोल फिनलँडच्या ऑलिव्हर अँटमनने केला.
या स्पर्धेत फिनलँडने पाच सामन्यातून 12 गुण मिळवले आहेत. च गटात फिनलँडचा संघ 15 गुणासह आघाडीवर असून कझाकस्तान 9 गुणासह दुसऱ्या स्थानावर तर डेन्मार्क तिसऱ्या स्थानावर आहे. फिनलँडचा कझाकस्तान बरोबरील सामन्यातील हा एकमेव गोल 78 व्या मिनिटाला नोंदवला गेला. पुढील उन्हाळी मोसमामध्ये 24 संघांचा सहभाग असलेली युरोपियन चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा जर्मनीत होणार आहे.









