प्रतिनिधी / वास्को
संध्याकाळी कारवर माड कोसळल्याने सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले. मागचे काही वास्कोत जोरदार पाऊस कोसळला तरी पडझडीच्या फारशा घटना घडल्या नव्हत्या. मात्र, गुरूवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काही नुकसानीच्या घटना घडल्या. बुटेभाट बायणा भागात एका कारवर माड कोसळण्याची घटना घडली. यात सुमारे दोन लाखांचे नुकसान झाल्याची माहिती अग्नशामक दलाने दिली. बेलाबाय भागात एक वृक्ष कोसळला. यात एका घराचे किरकोळ नुकसान झाले. जेटीवरील मुख्य रस्त्यावर तसेच चिखली, व्हाळांत व हार्बर भागातही वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. सांकवाळ भागातील एका अंतर्गत रस्त्यावर दरड कोसळण्याचीही घटना घडली. सडा वास्को मार्गावरील जेटी भागात रस्ता खचू लागलेला असून पाऊस सतत पडू लागल्यास वाहतुकीला या ठिकाणी धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.









