केस कापतानाचा व्हिडिओ व्हायरल
एका व्यक्तीने स्वत:चे केस रोबोटच्या मदतीने कापले आहेत. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून लोक दंग होत आहेत. तसेच रोबोटच्या हेअरकटची पद्धत पाहून भीतीही व्यक्त करत आहेत. या व्हायरल व्हिडिओत अमेरिकन इंजिनियर शेन विघटन एका विशेष रोबोटद्वारे स्वत:चा हेअरकट करवून घेत असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजेच शेन यांनीच हा रोबोट तयार केला आहे. या व्हिडिओला विघटनने स्वत:चे युट्यूब चॅनेल स्टफ मेड हेअरवर पोस्ट केला आहे. आता या व्हिडिओचा एक हिस्सा रेडिटवर व्हायरल झाला आहे. अशाप्रकारच्या यंत्रांची शक्यता अनंत असून सर्वात रंजक गोष्ट केस कापून घेण्याची असून ते एखाद्या व्यक्तीसाठी स्वत:च करणे अत्यंत अवघड आहे. स्वत:च्या डोक्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूपर्यंत योग्य पद्धतीने हेअरकट करविण्यासाठी रोबोटमध्ये एक ट्रिमर जोडला आणि स्वत:च्या केसांना योग्य लिथोफेन पॅटर्नने कापल्याचे विघटनने व्हिडिओ पोस्ट करताना नमूद केले आहे. हा रोबोट फर्स्ट जनरेशन मशीन असून केस कापण्याच्या काही अनोख्या धारणांचा शोध घेण्यासाठी आणखी एक यंत्र तयार करण्याचा माझा प्रयत्न आहे. माझ्या एका सहकाऱ्याने अचूक हेअर डाइंग अटॅचमेंट जोडणे आणि काही आकर्षक रंगांच्या हेअर स्टाइल तयार करण्याची सूचना केली आहे. या सुविधा मी विज्ञान अन् इंजिनियरिंगच्या नावावर अंमलात आणू शकतो असे विघटनने नमूद केले आहे.









