नवी दिल्ली
सोन्याच्या सततच्या वाढत्या किमतींमुळे जानेवारी ते मार्च या तिमाहीत सोन्याची मागणी कमी असते. जागतिक सुवर्ण परिषद (डब्लूजीसी)च्या मते, जानेवारी-मार्च तिमाहीत भारताची सोन्याची मागणी 17 टक्क्यांनी घसरून 112.5 टन झाली आहे.
सोन्याच्या किमती विक्रमी स्तरावर पोहचल्यामुळेच सोन्याच्या मागणीवर प्रत्यक्षात परिणाम जाणवला आहे. डब्लूजीसीच्या सोन्याच्या मागणीच्या ट्रेंडनुसार, 2022 मध्ये याच तिमाहीत सोन्याची एकूण मागणी 135.5 टन होती.
डब्ल्यूजीसीचे प्रादेशिक मुख्य कार्यकारी अधिकारी (भारत) सोमसुंदरम पीआर यांनी पीटीआयला सांगितले की, भारताची सोन्याची मागणी 2023 च्या पहिल्या तिमाहीत वर्षाच्या स्तरावर 17 टक्क्यांनी घसरून 112.5 टन झाली. किंमती विक्रमी पातळीवर वाढल्या आणि चढ-उतारसुद्धा यात होत आहेत.
चांदीच्या दराने गाठली नवी उंची, सोनंही चमकलं
याचा परिणाम सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीवर दिसला होता. पाहायला गेल्यास 2022 च्या पहिल्या तिमाहीतील 94.2 टनांवरून जानेवारी-मार्च 2023 मध्ये 78 टनांवर मागणी घसरली. तिमाहीत जागतिक सोन्याची मागणी वार्षिक 13 टक्क्यांनी घटून 1,080.8 टन झाली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत ही मागणी 1,238.5 टन होती.









