वेंगुर्ले (वार्ताहर)-
धूळवडीच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला शहर, परबवाडा व उभादांडा भागात विविध रंगांची उधळण करून रंगपंचमी साजरी करण्यात आली. शनिवारी शिमगोत्सवाची सांगता होत असतानाच वेंगुर्ल्यात मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी केली. सकाळी 11 वाजल्यानंतर ठिकठिकाणी नागरिकांनी एकत्र येत ढोल, ताशे, डिजेच्या तालावर नृत्याचा ठेका धरत जल्लोष केला. तरूणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता. विविध रंगांची उधळण करून एकमेकांना रंग लावला.









