कोल्हापूर :
सेवानिवृत्त प्राध्यापिकेला तिघा भामट्यांनी कुलाबा (माहिम, मुंबई) पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. आम्ही तुमच्या घरी येवून अटक करू,. त्याची बातमी सोशल मिडीयावर प्रसारीत करण्याची धमकी देवून, वृध्देच्या वेगवेगळ्या बँक खात्याची माहिती घेवून, तिच्या बँक खात्यातून 3 कोटी 57 लाख 23 हजार ऊपये घेवून, तिची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याविषयी राजारामपूरी पोलिसात तिघा अनोळखी भामट्यांच्याविरोधी गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद मिना मुरलीधर डांगरे (वय 75, रा. सरनाईक माळ, सम्राटनगर, कोल्हापूर) यांनी दिली आहे.
मिना डांगरे ही वृध्दा 18 एप्रिल 2025 रोजी एकट्याच घरी होत्या. त्यावेळी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर भामट्यांनी 989805427 या मोबाईल नंबरवऊन संपर्क साधला. त्यानंतर भामट्यांनी या वृध्देशी वेगवेगळ्या मोबाईल नंबरच्या व्हॉटसअॅप कॉलवऊन संपर्क साधून, तुमचा फोन दोन तासामध्ये बंद होणार आहे, असे सांगितले. त्यावर या वृध्देने त्याना तुम्ही कोठून बोलत आहात असा प्रश्न केला. त्यावर त्यानी आम्ही ट्राय डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे सांगून, वृध्देला तुमच्या विरोधी 2 जानेवारी 2025 रोजी फसवणूकीची तक्रार दाखल झाल्याची सांगून, तक्रार नंबर एमएच 56210225 असा असल्याचे सांगितले. नरेश गोयल मनी लॅन्डींग अॅण्ड इन्व्हेस्टमेंट फ्रॉडच्या केसमध्ये या वृध्देच्या आधार कार्ड आधारे कॅनरा बँक शाखा माहिम (मुंबई) या बँकेत 6 करोड जमा झाल्याचे खोटे सांगितले.
भामट्यांनी मुंबई पोलीस असल्याची खोटी माहिती सांगून, या वृध्देशी सतत मोबाईल व्हॉटसअॅप कॉलवऊन संपर्क साधून तिच्या वेगवेगळ्या बँकेत असलेल्या बँक खात्याची माहिती घेतली. त्यानंतर त्यानी या वृध्देला आपले बँक खाते क्रमांक सांगून त्यावर पैसे जमा करण्यास सांगितले. त्यावेळी या वृध्देने भामट्यांनी दिलेल्या बॅक खात्यावर पैसे पाठविण्यास नकार दिला. त्यावेळी मात्र भामट्यांनी या वृध्देला तुमच्या घरी पोलीस घेवून येवून अटक कऊ. त्यांची बातमी सोशल मिडीयावर प्रसारीत करण्याची धमकी दिली. या धमकीला घाबऊन या वृध्देने आपल्या वेगवेगळ्या बँकाच्या बँक खात्यावऊन आरटीजीएस व एनईएफटी व्दारे तिघा भामट्यांना 3 कोटी 57 लाख 23 हजार ऊपये पाठविले. त्यानंतर या वृध्देला तिघा भामट्यांनी मुंबई पोलीस असल्याची बतावणी कऊन, बँक खात्याची माहिती घेवून, खोट्या गुह्यात अटक करण्याची धमकी देवून, 3 कोटी 57 हजार 23 हजार ऊपयाला गंडा घातल्याचे लक्ष्यात आले. याबाबत वृध्देने राजारामपूरी पोलिसात मंगळवारी दुपारी अनोळखी तिघा भामट्याविरोधी कोट्यावधी ऊपयांची फसवणूक केल्याविषयी फिर्याद दिली आहे.
- सायबर पोलिसांच्या मदतीने तपास सुरु
मिना डांगरे या वृध्देची तिघा भामट्यांनी धमकावित, तिच्या बँक खात्याची माहिती घेवून, तिची 3 कोटी 57 लाख 23 हजार रुपयाची फसवणूक केली आहे. या प्रकाराची राजारामपूरी पोलिसांनी गांभीर्याने दखल घेवून, या गुह्याचा सायबर पोलिसांच्या मदतीने तत्काळ तपास सुरु केला आहे, अशी माहिती राजारामपूरी पोलीस ठार्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी दिली.








