एकच डिश ऑर्डर करायचा वृद्ध
अनेकदा आम्हाला एखाद्या कॅफे किंवा रेस्टॉरंटची एखादी डिश अत्यंत पसंत पडते आणि मग आपण वारंवार तेथे जात तीच डिश मागवत सतो. अशाच प्रकारे आयर्लंडच्या एका वृद्ध व्यक्तीला एका कॅफेची विशेष डिश अत्यंत पसंत होती. हा व्यक्ती अनेक वर्षांपर्यंत या कॅफेत जात एकच डिश ऑर्डर करत होता.
आयर्लंडच्या ग्रँगेकॉन किचन या कॅफेने स्वतःच्या या नियमित ग्राहकासाठी उचललेले पाऊल अत्यंत कौतुकास्पद आहे. कॅफेकडून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये स्वतःच्या या नियमित ग्राहकाला आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. जॉन ब्रेकफास्टमध्ये जे प्लॅटर ऑर्डर करायचे, कॅफेने त्याच प्लॅटरचे नाव स्वतःच्या मेन्यूत बदलून जॉन्स बेकफास्ट केले आहे. अशा स्थितीत जॉन हे कॅफेत पोहोचल्यावर मेन्यूकार्डमध्ये स्वतःचे नाव पाहून दंग झाले.

ग्रँगेकॉन किचनने इन्स्टाग्रावर शेअर केलेल्या व्हिडिओत मेन्यूमध्ये स्वतःचे नाव पाहून आनंदी झालेली जॉन दिसून येतात. जॉन यांच्या बेकफास्टमध्ये दोन सनी साइड अप. ग्रिल्ड व्हेजी आणि मीट सामील आहे. कॅफेने डिशचे नाव जॉन्स बेकफास्ट ठेवले असून याला ऑर्डर केल्यावर रिसिप्टमध्ये देखील हेच नाव दिसते.
जवळपास दररोज जॉन (आमचे उत्तम ग्राहक) नाश्त्यासाठी आमच्याकडे येतात आणि स्वतःची ऑर्डर देतात. याचमुळे वर्षापर्यंत जॉन यांचा हा विशेष नाश्ता पाहू आम्ही मेन्यूमध्ये जॉन्स ब्रेकफास्ट नाव देण्याचा निर्णय घेतला असे कॅफेने सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद केले आहे. या पोस्टला 23 हजारांहून अधिक लाइक्स आणि कॉमेंट्स मिळाल्या आहेत. अनेकांनी कॅफेचे कौतुक केले आहे.









