वायू प्रदूषणामुळे लोक 10 वर्षे अगोदरच वृद्ध होत असल्याचा खुलासा एका संशोधनातून झाला आहे. विषारी हवेच्या संपर्कात आल्यावर कोविड-19 मध्ये संबंधितांना 10 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांप्रमाणे अनुभव असल्याचे संशोधनात म्हटले गेले आहे. शुद्ध हवेत श्वास घेणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत प्रदूषित हवेत श्वास घेणारे रुग्ण 4 दिवस अधिक रुग्णालयात भरती राहतात.

प्रदूषित हवा श्वासनलिका आणि फुफ्फुसांवर थेट प्रभाव पाडत असून यामुळे अस्थमा सारख्या आजारांचा धोका वाढत आहे. वातावरण अन् नैराश्याचाही प्रभाव लोकांच्या वयावर पडत असल्याचे अन्य एका संशोधनात म्हटले आहे. मॅकमास्टर युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार आर्थिक आणि सामाजिक स्वरुपात वंचित शहरी भाग आणि नैराश्यात राहणे लोकांना लवकर वृद्ध करू शकते. वातावरण अन् बायोलॉजिकल एजचे सहसंबंध व्यक्तिगत आरोग्य अन् वर्तनासंबंधी रिस्क फॅक्टर्सनला विश्लेषित केल्यावरही कायम राहत असल्याचे संशोधनात म्हटले गेले आहे.

वायूप्रदूषणामुळे लोक 36 टक्के अधिक आजारी
बेलियममध्ये झालेल्या संशोधनानुसार वायू प्रदूषणामुळे लोक 36 टक्के अधिक आजारी पडतात. तर डेन्मार्कमध्ये झालेल्या एका संशोधनात वायू प्रदूषणामुळे कोविड-19 रुग्णांमध्ये मृत्यूची जोखीम 23 टक्क्यांनी वाढल्याचे म्हटले गेले. संशोधकाहंनी मे 2020 पासून मार्च 2021 दरम्यान रुग्णालयात दाखल 300 कोरोनाबाधितांवर अध्ययन केले. त्यांच्या घरात आढळलेले तीन प्रदूषक-सुक्ष्म करण, नायट्रोजन डायऑक्साइ आणि राखेशी निगडित डाटा जमविण्यात आला. याचबरोबर संपर्कात आलेल्या प्रदूषणाची पातळीही नोंदविली गेली. रुग्णालयात दाखल होण्याच्या एक आठवड्यापूर्वी जे लोक प्रदूषणाच्या अधिक पातळीच्या संपकांत आले ते इतरांच्या तुलेत 4 दिवस अधिक रुग्णालयात दाखल होते असे संशोधनात आढळून आले.
डीएनएद्वारे समजून घेतले कोरिलेशन
सेलुलर स्तरावर वय वाढण्याशी निगडित संशोधनासोबत क्रोनोलॉजिकल ऐज आणि बायोलॉजिकल ऐज यांच्यातील अंतर जाणून घेण्यासाठी संशोधकांनी दोन डीएनए मिथाइलेशन बेस्ड एस्टीमेटर्सचा वापर केला. डीएनए मिथाइलेशन-बेस्ड एस्टिमेटर्सना एपिजेनेटिक क्लॉक्स देखील म्हटले जाते. आसपास लोक नसणे आणि नैराश्यामुळे एपिजेनेटिक ऐज वाढली, यामुळे ठराविक वयापूर्वीच वृद्धत्व आल्याचे पुरावे मिळाले. नैराश्यामुळे होणाऱ्या इमोशनल डिस्ट्रेसमुळे अधिक नुकसान होते असे संशोधनात आढळून आले.









