महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना निवेदन
कोल्हापूर प्रतिनिधी
खासगी शाळेतील शिक्षकांनाही मोफत गणवेश द्यावे, केंद्रप्रमुख भरतीच्या स्पर्धा परीक्षेमध्ये खासगी शाळांतील पात्र शिक्षकांनासुद्धा समाविष्ठ करून घ्यावे. शाळा सुरू झाल्यानंतर संचमान्यता करून त्वरीत शिक्षक भरती करा, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या शिष्टमंडळाने शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना दिले. यावर संचमान्यतेनंतर त्वरीत शिक्षक भरती करणार, असे आश्वासन शिक्षणमंत्री केसरकर यांनी शिष्टमंडळाला दिले.
निवेदनात म्हंटले आहे, शालेय शिक्षण मंत्र्यांची भेट घेवून राज्यातील खासगी शाळांच्या प्रश्नासंदर्भात चचां केली. तसेच प्लॅनमधील शिक्षकांच्या वेतनासाठी तात्काळ अनुदान उपलब्ध करुन द्यावे, जुनी पेन्शन योजना लागू करावी करावी, अशा मागण्या केल्या आहेत. यावर शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले, संच मान्यतेनंतर रिक्त पदांची संख्या निश्चित करून शिक्षक भरती करण्यात येईल. तसेच खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांनाही मोफत गणवेश यासह शिक्षकांच्या अन्य मागण्यासंदर्भात राज्य शिक्षण आयुक्त डॉ. सूरज पांढरे यांच्याबरोबर चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. तसेच जुन्या पेन्शन योजनेचा त्रिसदस्यीय समितीचा अहवाल आल्यावर सरकार त्यावर निर्णय घेईल. मंत्री दीपक केसरकर यांचा समितीच्या वतीने राज्याध्यक्ष भरत रसाळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी राज्यसचिव शिवाजी भोसले, शहर कार्याध्यक्ष शिवाजी सोनाळकर, पांडुरंग गवळी आदी उपस्थित होते.









