न्हावेली / वार्ताहर
न्हावेली गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर ४ या शाळेतील वर्गखोल्यांची छप्पर नादुरुस्त होऊन पावसाळ्यात पाण्याची वर्गात गळती होत आहे. यामुळे विद्यार्थांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याची माहिती ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकरांना याबाबतचे सह्यांचे निवेदन दिले आहे , तसेचं ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेऊन याबाबत शिक्षणमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून शाळेची छप्पर दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. यावेळी आनंद परब,सुमन गावडे,गंगाराम मेस्री,गणेश नाईक,मधुकर नाईक,समिक्षा गावडे,नितेशा नाईक,दिव्या मेस्री,चारुशिला पार्सेकर,रसिका नाईक,सिद्धेश पार्सेकर,उमेश गावडे,संतोष नाईक,स्नेहा पार्सेकर,श्रीराम नाईक,शाम नाईक,लाडोबा मांजरेकर,रुपेश नाईक,प्रिया सावंत,सोनम मेस्री,शितल साळसकर,वैभवी नेमण,प्रिया नाईक,शमिका नाईक,दिव्या मेस्री,गजानन मेस्री,आनंद नाईक,अजित न्हावेलकर,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









