भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर विश्व अजिंक्मयपद स्पर्धेत दोन आणि राष्ट्रकुल स्पर्धेत तीन सुवर्णपदक पटकावलेल्या कुस्तीपटू विनेश फोगाट हिने केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी भारतीय ऑलिंपिक संघटनेने शुक्रवारी रात्री सात जणांच्या समितीची स्थापना केली. आता बॉक्सिंगपटू मेरी कोम यांच्या नेतृत्वाखाली सहदेव यादव, डोला बॅनर्जी, योगेश्वर दत्त, अलकनंदा अशोक आणि दोन वकील या प्रकरणाची चौकशी करतील. दोन दिवसांपासून दिल्लीत जंतर-मंतरवर कुस्तीपटू आंदोलन आणि केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्यासोबत चर्चा करत होते. चौकशी होईपर्यंत ब्रिजभूषण सिंह यांना पदावरून हटवले हे बरे झाले. एकाधिकारशाही आणि कुस्तीतील मस्तीला चपराक बसली आहे. या टगेगिरीचा अनुभव महाराष्ट्राने अनेकदा खेळाडूंच्या निवडीवेळी घेतला. वेळोवेळी आवाज उठवूनही महाराष्ट्राचे प्रयत्न व्यर्थ ठरले. मात्र विनेश फोगाटसह आघाडीच्या खेळाडूंनी, ऑलिंपिक विजेत्यांनी जंतर-मंतरवर आंदोलन केल्यानंतर भारत सरकार खडबडून जागे झाले. फोगाटच्या आरोपांमुळे खुद्द ब्रिजभूषण सिंह यांच्यासह पुरुष प्रशिक्षकांची महिला प्रशिक्षक आणि कुस्तीपटूंविषयी वागणूक कशी होती हे उघड झाले आहे. अर्थात सिंह यांनी या आरोपांचा इन्कार केलाय. दोषी आढळतो तर फाशी लावून घेईन असे म्हटले आहे. तक्रार फक्त फोगाट यांनी केली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. पण, केवळ फोगाट यांनी आरोप केला असता तर तो त्यांचा व्यक्तिगत काही राग अथवा द्वेष असेल असे समजू शकले असते. पण साक्षी मलीकसह एकाचवेळी भारतातील ऑलिंपिकपटू जेव्हा आंदोलनात उतरतात तेंव्हा त्याची गांभीर्याने दखल घ्यावीच लागते. हे बंड आवश्यक होते. विशेषतः हरियाणातील खेळाडूंनी हे बंड केल्यामुळे त्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले. या सगळय़ा वादाचे मूळ कुठेतरी लखनऊ येथे असणाऱया महिला प्रशिक्षण केंद्रामध्ये आहे. पंजाब ही कुस्तीची महत्त्वपूर्ण भूमी. पण इथल्या पटियालामध्ये असलेल्या या केंद्राला ब्रिजभूषण सिंह हे उत्तर प्रदेशचे आणि महासंघाचे अध्यक्ष असल्यामुळे कुस्तीशी काहीही संबंध नसणाऱया नवाबांच्या नगरी लखनऊमध्ये आणण्यात आले. संपूर्ण भारतातील ज्ये÷ खेळाडूंचा याला विरोध आहे. इथे प्रशिक्षणाला येण्यासाठी महिला खेळाडूंना आपले राज्य सोडून यावे लागते. त्यामुळे त्यांच्या मनात आधीच असुरक्षिततेची आणि परमुलुखात आल्याची भावना असते. त्यात त्यांना प्रशिक्षकांकडून जर त्रास दिला गेला असेल तर त्याबाबत असणाऱया तक्रारिंकडे ब्रिजभूषण सिंह यांनी महासंघाचे अध्यक्ष म्हणून गांभीर्याने पाहिले पाहिजे होते. मात्र असे काही घडलेच नाही असा त्यांचा दावा आहे. तर इथे महिला प्रशिक्षकसुद्धा असुरक्षित आहेत आणि ब्रिभूषण सिंह यांच्या लाडक्मया पुरुष प्रशिक्षकांकडून त्यांना आणि खेळाडूंना त्रास दिला जातो. खुद्द सिंह हे सुद्धा शोषणात अडकले आहेत असा विनेश फोगाटने आरोप केलेला आहे. परराज्यातील तक्रारिंकडे दुर्लक्ष करण्याची सिंह यांची जुनी रीत आहे. त्याचा फटका ऑलिंपिकमध्ये महाराष्ट्राच्या राहुल आवारेला बसला होता. शिवाय दिल्लीच्या सुशील कुमारलाही किंमत मोजावी लागली होती. नरसिंग यादव हा खरे तर महाराष्ट्राचा खेळाडू. मात्र त्याचे जन्मस्थळ उत्तर प्रदेश आहे. म्हणून त्यालाच ऑलिंपिकला पाठवायचे असा चंग बांधून सिंह यांनी त्याच्या बाजूने कारभार केला. राहुल आवारेला त्यावेळी फटका बसला. त्याच्यावरील अन्याय दूर करावा म्हणून ज्ये÷ नेते शरद पवार आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न करूनही खासदार सिंह यांनी दोघांना जुमानले नाही. आपला शिष्य सुशील कुमार याच्यावर अन्याय होतोय म्हणून ज्ये÷ कुस्तीगीर सतपाल यांनी आवाज उठवला. मात्र त्यांना संघटनेच्या राजकारणात मात दिलेल्या सिंह यांनी मोडून काढायचे ठरवले. नरसिंग यादववर भारतातच डोपिंगचे आरोप झाले. मात्र, तरीही त्याला ऑलिंपिकला पाठवण्यात आले आणि वाडा या आंतरराष्ट्रीय संघटनेने ऑलिंपिक स्पर्धेपूर्वी केलेल्या चाचणीत नरसिंग दोषी आढळला. त्याला खेळता आले नाहीच. मात्र भारताचीही नाचक्की झाली. इतके होऊनही ब्रिजभूषण सिंह आजतागायत त्या पदावर मांड ठोकून होते. निवडणुकीत त्यांच्या विरोधात मतदान केले म्हणून महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बाळासाहेब लांडगे यांना धक्का देण्यासाठी महाराष्ट्रातील दुसऱया एका गटाला हाताशी धरून नुकताच सिंह यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेत खेळ केला. किरकोळ कारण शोधून परिषद बरखास्त करून अस्थायी समिती नेमली. त्यांच्यामार्फत महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवल्या. त्याला कुस्तीगीर परिषदेची मान्यता मिळणार नाही म्हणून भारतीय कुस्तीगीर महासंघाचे प्रमाणपत्र खेळाडूंना दिले. यातून आज भाजपच्या बाजूचा एक गट प्रबळ झाला असे वाटत असले तरी त्यातून महाराष्ट्राचे कायमस्वरूपी नुकसानच होणार आहे. महाराष्ट्रातील या गटालाही केवळ नामधारी मांडलिक बनवून ठेवले जाईल. पंजाबमध्ये सर्वाधिक कुस्ती आहे. मात्र आज पंजाबचा महासंघात आवाजच नाही. भविष्यात महाराष्ट्राची वाटचाल त्या दिशेने झाली तर आश्चर्य वाटायला नको. इंडियन ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्ष आणि प्रसिद्ध धावपटू पी. टी. उषा यांनी लैंगिक शोषणाच्या आरोपाबाबत यापूर्वीच एक ट्विट करून महिला खेळाडूंनी आपली तक्रार घेऊन ऑलिंपिक असोसिएशनशी संपर्क साधावा असे आवाहन केले होते. खेळाडूंच्या हिताला असोसिएशन सर्वोच्च प्राधान्य देईल असेही त्यांनी आश्वस्त केले होते. मात्र महासंघातील राजकारण याहून वेगळय़ा पातळीवरचे असल्याने पी. टी. उषा यांचा शब्द कितपत पाळला जाईल याची कुस्तीगिरांना शंका असावी.
त्यांच्याबाबत खेळाडूंनी आरोप केल्यानंतर संशयाच्या अधिक घेऱयात आले आहेत. सध्याला चौकशी समिती तर नेमली आहे. पण ती योग्य पद्धतीने काम करेल आणि भारत सरकार कोणालाही पाठीशी न घालता भारतीय खेळाडूंचे हित साधेल हीच अपेक्षा.









