कारागृहात तिहेरी मोक्याच्या गुह्यात असलेल्या कुख्यात जर्मनी गँगच्या म्होरक्या, साथिदाराने दिली धमकी; गँग प्रमुख नामचिन गुंड, त्याचा पोलीस रेकॉर्डवरील साथिदाराविरोधी पोलिसात गुन्हा
इचलकरंजी वार्ताहर
कोल्हापूरातील कळंबा कारागृहात तिहेरी मोक्याच्या गुह्यात असलेल्या इचलकरंजीतील कुख्यात जर्मनी टोळीचा म्होरक्या आणि त्याचा पोलीस रेकॉर्डवरील साथिदारांने या टोळीविरोधी पोलिसात फिर्याद दिलेल्या शहापूर (ता. हातकणंगले) येथील रिअल इस्टेट व्यावसायिकाला धमकी देण्यात आली. विशेष म्हणजे ही धमकी आरोपी ओळख परेड दरम्यान संबंधीत रिअल इस्टेट व्यावसायिकाला कारागृह अधिकारी आणि पोलिसांच्या समोर देण्यात आली.
या प्रकरणी जर्मनी टोळीचा म्होरक्या आणि नामचिन गुंड आंनद्या उर्फ आंनदा शेखर जाधव उर्फ जर्मनी (रा. जवाहरनगर, इचलकरंजी) आणि पोलीस रेकॉर्डवरील त्याचा साथिदार ऊप्या उर्फ ऊपेश पंडीत नरवाडे (रा. दत्तनगर, कबनूर) या दोघाविरोधी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी रिअल इस्टेट व्यावसायिक सरदार अमिन मुजावर (रा. गैबान रेसिडेन्सी, शहापूर, ता. हातकणंगले) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
जर्मनी टोळी प्रमुख कुख्यात गुंड आंनद्या उर्फ आंनदा जाधव उर्फ जर्मनी हा काही महिन्यापूर्वी जामीनावर डब्बल मोक्याच्या गुह्यातून कारागृहातून बाहेर होता. बाहेर येताच त्याने मोक्याच्या गुह्याबरोबर खूनाच्या गुह्यात कारागृहात असलेल्या भाऊ आद्या उर्फ आदर्श जाधव याला जामीनावर सोडण्यासाठी प्रयत्न सुऊ केले. महश्या उर्फ महेश माळी याच्याबरोबर हातमिळवणी केली. याचदरम्यान गुंड आंनद्या, महेश माळीने संगमनत कऊन, खंडणीसाठी सरदार मुजावर यांचे अपहरण करून त्यांच्याकडील 18 तोळे सोन्याचे दागिणे आणि चार लाखांची रोकड असा 11 लाख 35 हजार ऊपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेवून पोबारा केला होता. या विषयी शहापूर पोलिसात जर्मनी टोळीच्या म्होरक्या, व्हाईंट कॉलर गुन्हेगार माळीसह टोळीतील 16 जणाविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी टोळी प्रमुख, व्हाईंट कॉलर गुन्हेगारासह सर्व संशयीत गुन्हेगारांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यासर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची रवानगी कोल्हापूरातील कळंबा कारागृहात करण्यात आली आहे.
याच दरम्यान पोलिसांनी कुख्यात जर्मनी टोळीच्या वाढत्या गुन्हेगारी कारनाम्याची दखल घेवून, मोका कायद्यातंर्गत कारवाई केली. रविवारी सकाळी या गुह्याच्या तपासी अधिकाऱ्यांनी गुह्यातील गुन्हेगारांची ओळख परेड होती. याचवेळी फिर्यादी मुजावर यांना कुख्यात जर्मनी टोळीचा म्होरक्या आणि नामचिन गुंड आंनद्या उर्फ आंनदा जाधव उर्फ जर्मनी आणि पोलीस रेकॉर्डवरील त्याचा साथिदार ऊप्या उर्फ ऊपेश नरवाडे या दोघांनी ‘ये इकडे बघ कारागृहातून बाहेर आल्यावर तुला मारतो’ अशा शब्दात धमकी दिली.