अजब खेळात उलट्या टेबलखालून खेळाडू होतात रोल
तुम्ही आजवर अनेक मजेशीर स्पर्धा पाहिल्या असतील, ज्यात लोकांना विविध प्रकारचे टास्क देण्यात येतात. अनेकदा तर काही प्रकारच्या स्पर्धा खूपच अजब असतात. आता एका अशाच शर्यतीत काही लोकांच्या टीमला स्वत:वर एक उलटे टेबल ठेवून न्यावे लागते.सर्वसाधारणपणे पार्टीजमध्ये कुठल्याही प्रकारची स्पर्धा ठेवण्याचा उद्देश मौजमजा असतो. अशाच एका स्पर्धेत टीमच्या काही लोकांना उलट्या टेबलखाली झोपावे लागते आणि टेबलवर एक इसम उभा असतो. टीमला रोल होत उलटे टेबल पुढे न्यायचे असते, टेबल लोकांच्या पुढे गेल्यास मागे राहिलेले लोक पुढे येत पुन्हा त्याखाली आडवे होतातात, ज्यामुळे टेबलाचा जमिनीशी स्पर्श टाळला जातो.
टेबल सरकविणे सर्वात मजेशीर
लोक रोल होताच टेबल पुढे सरकते, लोक टेबलाच्या पुढे पोहोचल्यास टेबलाचा जमिनीशी स्पर्श होण्याची भीती असते. शर्यतीत टेबलाला जमिनीशी स्पर्श करू न देण्याची अट असते. हा खेळ अनेक लोकांना पसंत पडला आहे. तर काही लोकांना हा खेळ धोकादायक देखील वाटला आहे.









